27 July 2024 9:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा HUDCO Share Price | मल्टिबॅगर शेअरसाठी BUY रेटिंग, कंपनीबाबत अपडेट आली, यापूर्वी 400% परतावा दिला IPO GMP | स्वस्त IPO आला रे! ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मिळेल 100% परतावा
x

Gulabrao Patil | ED ब्रह्मास्त्र वारंवार वापरू नये, अन्यथा पुराणकालातील ब्रम्हास्त्राप्रमाणेच बोथट होईल - गुलाबराव पाटील

Gulabrao Patil

मुंबई, ०१ ऑक्टोबर | ईडीकडून होत असलेल्या कारवायांवर जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार निशाणा साधला आहे. आज ईडीचा वापर होत आहे. मात्र ब्रह्मास्त्र हे वारंवार वापरता कामा नये याचे पुराणकालापासून दाखले आहेत. याच प्रमाणे ईडचे ब्रह्मास्त्र वापरले की, ते बोथट होणारच, अशा शब्दात गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) टोला लगावला.

Jalgaon Guardian Minister Gulabrao Patil has strongly targeted the actions being taken by the ED. ED is being used today. However, there are evidences from ancient times that Brahmastra should not be used frequently :

काल नाशिक येथील महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण व संशोधन संस्था ‘मित्रा’ च्या नूतन इमारतीच्या व मुख्य अभियंता कार्यालयाच्या इमारतीच्या ई-उद्घाटन करण्यात आले. यानंतर गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यात ईडीकडून होत असलेल्या कारवायांवर भाष्य केलं. एकनाथराव खडसे यांच्यावरील ईडी कारवाईच्या चर्चेबाबत भाष्य करतांना त्यांनी केंद्र सरकार ईडीचा गैरवापर करत असल्याची टीका देखील ना. पाटील यांनी केली.

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, देशात राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशन अंतर्गत मीत्रा संस्था मुख्य संसाधन केंद्र ठरणार आहे. 2024 पर्यंत हर घर जल हे उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी तसेच पाणी पुरवठ्याच्या योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. त्याकरीता या प्रशिक्षण संस्थेचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यशदा प्रशिक्षण संस्थेने प्रमाणेच अनेक आधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण अशी मीत्रा प्रशिक्षण संस्था देशपातळीवर नाव लौकिक मिळवेल, असा विश्वास मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Gulabrao Patil criticized BJP over ED actions series.

हॅशटॅग्स

#GulabraoPatil(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x