मुंबई : महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित आणि वजनदार वकील उज्ज्वल निकम यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचे पॉवरफुल्ल युक्ति'(वाद) सुरू असल्याचं वृत्त आहे. सध्या सर्वच पक्षांमध्ये कायदेतज्ज्ञाना मोठं महत्व प्राप्त झालं आहे. मजीद मेमन यांच्यानंतर आणि त्याहूनही मोठं नाव म्हणजे उज्वल निकम. देशातील तसेच राज्यातील अनेक महत्वाचे खटले त्यांनी लढवले आहेत आणि हिंमतीने जवाबदारी पार पाडली आहे.

उत्तम ज्ञान असणारे आणि प्रभावशाली वक्तृत्व असणारे लोकं सध्या सर्वच पक्षांना सभागृहात असावे असं वाटू लागलं आहे. त्यात थेट लोकांच्या मनातील आदर असलेलं व्यक्तिमत्व असले तर त्याचा थेट निवडणुकीत सुद्धा फायदा होतो आणि पक्षाची प्रतिमा सुद्धा उंचावते. त्यामुळेच पॉवरफुल्ल युक्ति'(वाद) सुरु असून पक्षातील वरिष्ठ नेते मंडळी त्यासाठी जोरदार प्रयत्न करत असल्याचे समजते.

आगामी लोकसभा निवडणुकीत पूर्ण तयारीनिशी उतरून भारतीय जनता पक्षाला राज्यात जेरीस आणण्याचा पवारांनी जणू इरादा पक्काच केला आहे असं म्हणावं लागेल. अशातच, राज्यातील एक प्रतिष्ठित, वजनदार आणि जनमानसात आदर असलेले वकील उज्ज्वल निकम यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचे ‘पॉवरफुल्ल’ प्रयत्न सुरू असल्याचं वृत्त आहे. जळगाव मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्याबाबत एनसीपीच्या कालच्या मुंबईमधील बैठकीत चर्चाही झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या वृताला स्वतः उज्वल निकम यांनी कोणताही अधिकृत दुजोरा दिला नसला तरी, पुढे काय होतं ते पाहावं लागणार आहे.

top reputed advocate ujjwal nikam may contest lok sabha election ncp candidate