15 December 2024 6:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

शिवसेनेशी चर्चा होत नसल्याने भाजप'मधील दिग्गजांची तोंडं बंद?

Shivsena, BJP Maharashtra

मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून बराच कालावधी लोटला असला तरी राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा मात्र सुटताना दिसत नाही. मुख्यमंत्रिपद असेल किंवा काही महत्त्वाची खाती असतील यावरून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामधील वाद अद्यापही सुटला नाही. भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्रिपद शिवसेनेला न देण्यावर ठाम आहे. तर दुसरीकडे शिवसेना अडीच अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद मिळवण्यावर ठाम आहे. अशातच दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहे. अशातच शिवसेनेने पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत ते मावळते मुख्यमंत्री असल्याचा उल्लेख केला आहे.

महाराष्ट्रात लवकरात लवकर नवे सरकार स्थापन होणे हे देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, तितकेच ते राज्याच्या मऱहाटी जनतेसाठी महत्त्वाचे आहे. पण सत्तास्थापनेचा घोळ घालायचा व त्या परिस्थितीचा लाभ घेऊन सरकार नसतानाही अप्रत्यक्ष सूत्रे हातात ठेवून राज्यकारभार हाकायचा हे घटनाविरोधी आहे. नवे राज्य मोकळय़ा वातावरणात यावे, पण एकदाचे राज्य यावे हीच अपेक्षा आहे. महाराष्ट्राच्या जनतेने ‘कौल’ दिला आहे. दिल्लीच्या गढूळ वातावरणातून मावळते मुख्यमंत्री महाराष्ट्रात उतरतील तेव्हा त्यांना पुढचे पाऊल टाकावेच लागेल. त्यांच्या पावलावरच राज्याची पुढची दिशा ठरेल असं शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे.

दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीला बहुमत मिळाल्यावर राज्यात सहज सरकार स्थापन करता येईल, असे गृहित धरलेल्या भारतीय जनता पक्षामध्ये सध्या कमालीची अस्वस्थता आहे. अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद व सत्तेतील समान वाटा या मागण्यांसाठी अडून बसलेल्या शिवसेनेने चर्चेचे दरवाजेच बंद केल्याने सर्वात मोठा पक्ष असूनही भारतीय जनता पक्षाच जात्यात आला आहे. त्यातच युतीचे सरकार स्थापन झाले तरी, महसूल, सार्वजनिक बांधकाम, अर्थ अशी महत्त्वाची खाती शिवसेनेला द्यावी लागणार असल्याने भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते नाराजीचा सूर काढत आहेत.

शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद दिले नाही, तरी इतर काही महत्त्वाची खाती मात्र भारतीय जनता पक्षाला सोडावीच लागणार आहेत. नगरविकास आणि गृह हे विभाग मुख्यमंत्र्यांकडे राहतील. महसूल, अर्थ, सार्वजनिक बांधकाम आदी खाती शिवसेनेकडे गेली, तर भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ मंत्र्यांना कमी दर्जाच्या खात्यांवर समाधान मानावे लागेल, असा सूर भारतीय जनता पक्षामध्ये निघत आहे.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x