3 May 2024 12:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

मोदी हे स्वातंत्र्यानंतर भारताला लाभलेले सर्वात वाईट पंतप्रधान: कॅप्टन अमरिंदर सिंह

चंदीगढ : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी स्वातंत्र्यानंतर देशाला जे पंतप्रधान लाभले आहेत, त्यांच्यातील नरेंद्र मोदी हे सर्वात वाईट पंतप्रधान आहेत अशी खरमरीत टीका त्यांनी केली आहे. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी, १९८४ मधील दंगल आणि इतर अनेक मुद्द्यांवरुन काँग्रेसला लक्ष केल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काल मोदींवर जोरदार निशाणा साधला.

पहिल्यांदा मागील ५ वर्षांत आपण दिलेल्या आश्वासनांपैकी पूर्ण करण्यात आलेलं एक तरी आश्वासन लोकांना सांगावं असं थेट आव्हान त्यांनी नरेंद्र मोदी यांना दिलं आहे. दरम्यान, मोदींनी गुरुवारी गुरुदासपूर येथे घेतलेल्या प्रचारसभेत उपस्थितांशी संवाद साधताना काँग्रेसवर टीका केली होती. नरेंद्र मोदी यांनी जुमले मारत तसेच धोका देत आणि स्वतःच्या मनाच्या गोष्टी सांगत देशाची पातळी खालावली आहे. सामान्य लोकांनासुद्धा आपलं भलं व्हावं असं वाटत असल्यानेच ते मोदींना सत्तेवरुन हटवण्याच्या तयारीत आहेत’ असा सिंह यांनी हल्लाबोल केला.

ते पुढे म्हणाले की, ‘नरेंद्र मोदी सामान्य लोकांना कोणत्या तोंडाने निवडून द्या असे सांगत जाणार आहेत? असाच प्रत्येकजण विचार करू लागला आहे. दरम्यान, पुढे त्यांनी नरेंद्र मोदी हे इतिहासातील सर्वात वाईट पंतप्रधान असल्याचं म्हटलं. त्याआधी गुरुदासपूर येथील प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं की, ‘देशातील इतर राज्यांप्रमाणे काँग्रेसने पंजाबमध्येही कर्जमाफीची घोषणा केली होती. परंतु, आज दीड वर्षांनी काय परिस्थिती आहे, ते सर्वांनाच चांगले माहीत आहे. राष्ट्रीय काँग्रेसने भूतकाळात अशा लोकांचं कर्ज माफ केलं होतं जे कधी शेतकरीच नव्हते. काँग्रेसने केवळ गरिबी हटवण्याच्या बहाण्याने अनेक दशकं देशाला लुटलं आणि आता सुद्धा कर्जमाफीच्या नावाने ते तेच करत आहेत’ अशी टीका केली होती. त्याला आज अमरिंदर सिंह यांनी चांगलेच चपराक देणारे प्रतिऊत्तर दिले आहे.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x