11 July 2020 2:19 PM
अँप डाउनलोड

पंजाब रेल्वे दुर्घटना; लोकं मोबाईल शूटमध्ये गुंग, फटाक्यांचा आवाज व प्रकाशात रेल्वेचे दिवे आणि भोंगे ऐकू गेले नाहीत?

अमृतसर : पंजाबातील अमृतसरजवळील जोडा रेल्वेफाटकाजवळ ‘रावण दहन’ बघण्यासाठी जमलेली स्थानिकांची गर्दी रेल्वे रुळावर सुद्धा जमली असतानाच या लोहमार्गावरून वेगाने आलेल्या एक्सप्रेस गाडीची धडक बसून तब्बल साठ जणांनी प्राण गमावले आहेत तर ५१ जण जबर जखमी झाल्याचे असं वृत्त आहे. या संपूर्ण घटनेने देशभरात खळबळ माजली आहे. पंजाब सरकारने एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. तसेच मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी या दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश सुद्धा प्रशासनाला दिले आहेत.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

शनिवारी सकाळी विजयादशमीनिमित्त ‘रावण दहना’चा पारंपरिक कार्यक्रम सुरू होता. हा कार्यक्रम मानावाला आणि फिरोजपूर रेल्वे स्थानकांदरम्यान लोहमार्गाजवळच्या मोकळ्या जागेत आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम पाहण्यासाठी सुमारे ३०० स्थानिकांनी एकच गर्दी केली होती. रावण दहनादरम्यान पुतळ्याच्या अंगावरील फटाके जोराने वाजण्यास सुरुवात झाली आणि ते उपस्थितांच्या अंगावर उडू लागले. त्यामुळे सुद्धा बरेच लोक लोहमार्गावर चुकून रेल्वे रुळांवर उभे राहून रावण दहन पाहू लागले. परंतु अनेकजण मोबाईल रेकॉर्डिंगमध्ये गुंग झाले असतानाच जालंधरहून अमृतसरकडे वेगाने निघालेली गाडी या मार्गावरून धडाडत आली. परंतु फटाक्यांच्या प्रचंड आवाज आणि फटाक्यांच्या प्रकाशात रेल्वेचे दिवे आणि भोंगे कुणाला ऐकूच गेले नाहीत आणि दुर्घटना घडल्याचे अनेक उपस्थितांनी सांगितलं.

धक्कादायक म्हणजे मुत्यू झालेले कोणीही प्रवासी नव्हते, असे नमूद करत ते ‘घुसखोर’ म्हणून रेल्वेने त्यांची नोंदणी केली आहे. त्यामुळेच रेल्वेकडून या मृतांना कोणतीही भरपाई दिली जाणार नसल्याचे सांगण्यात आले.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x