नवी दिल्ली: दिल्ली ते गल्ली आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. दरम्यान दिल्लीत केजरीवाल सरकारने शिक्षणापासून अनेक विषयांमध्ये विकासाची भरीव कामगिरी केलेली असताना भाजपासाठी दिल्लीतील लोकसभा सोपी राहिलेले नाही. दिल्ली प्रशासनातील सुसूत्रता सुद्धा आप पक्षाच्या पथ्यावर पडणार आहेत. त्यामुळे दिल्लीच्या विकासात प्रकाश केजरीवाल सरकारने टाकला असला तरी आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्ष ‘दिवे’ लावण्याची तयारी करत असल्याचे वृत्त आहे.

मिशन २०१९ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी २६ फेब्रुवारीला देशभरात दिवाळी साजरी करणार आहे. भारतीय जनता पक्षाकडून ‘कमल ज्योती संकल्प’ उत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारच्या विविध योजनांचे लाभार्थी असलेल्या लोकांच्या घरात दिवे लावले जाणार आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक घराला भारतीय जनता पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न पक्षाकडून करण्यात येणार आहे. या उपक्रमाला कमल ज्योती संकल्प उत्सव असं नाव देण्यात आलं आहे. या अंतर्गत नरेंद्र मोदी सरकारच्या योजनांचे लाभार्थी असलेल्या प्रत्येक घरांमध्ये दिवे लावण्यात येतील. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, स्टँड अप इंडिया, मुद्रा योजना, जन-धन योजना यासारख्या योजनांच्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन भारतीय जनता पक्ष २६ फेब्रुवारीला दिवे लावणार आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षालाच मतदान करा, असं थेट आवाहनही त्यामार्फत पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून केलं जाणार आहे. मुख्य म्हणजे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, स्टँड अप इंडिया, मुद्रा योजना, जन-धन योजनांचे वास्तव समोर येऊन सुद्धा भाजप तेच पुढे रेटण्याचा तयारीत आहेत.

याशिवाय भाजपा १२ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी या कालावधीत ‘मेरा परिवार भाजपा परिवार’ अभियान राबवणार आहे. या दरम्यान भाजपाचे सर्व स्थानिक कार्यकर्ते त्यांच्या घराबाहेर भाजपाचं स्टिकर लावतील. याशिवाय घराच्या छतावर भाजपाचा झेंडाही लावण्यात येईल. २ मार्चला दिल्ली भाजपाकडून प्रत्येक विधानसभा क्षेत्रात बाईक रॅली काढण्यात येणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील ५०० ते १००० कार्यकर्ते यामध्ये सहभागी होणार आहेत.

delhi bjp light diyas on 26 february to connect with delhi voters through narendra modi govt scheme