15 December 2024 1:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

आज योगींची पश्चिम बंगालमध्ये सभा, वातावरण तापण्याची शक्यता

लखनौ : पश्चिम बंगालमध्ये सीबीआय अधिकाऱ्यांना झालेल्या अटकेनंतर आधीच राजकीय वातावरण तापलेले असताना, आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पश्चिम बंगालमध्ये जनसभा घेणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, आजच्या सभेसाठी ते झारखंडपर्यंत विमानमार्गाने जाणार आहेत.

त्यानंतर थेट रस्तेमार्गाने पुरुलिया जिल्ह्यात जाऊन सभा घेतील. त्याआधी रविवारी पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्री ममता सरकारने योगींना बंगालमध्ये हेलिकॉप्टर उतरविण्याची परवानगी नाकारली होती. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यात हेलिकॉप्टर उतरणार होते. ते ‘गणतंत्र बचाओ रॅली’ घेणार होते. ती होऊ न दिल्याचा ममतांच्या तृणमूल सरकारवर भारतीय जनता पक्षाने आरोप लावले होते. परंतु, आता योगी रस्तेमार्गाने पश्चिम बंगालमध्ये येऊन पुन्हा एकदा जनसभा घेण्याचा प्रयत्न करणार आहेत.

हॅशटॅग्स

#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x