14 November 2019 1:11 PM
अँप डाउनलोड

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचे निधन

नवी दिल्ली : काल दिल्लीच्या दौऱ्यावर गेलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं आज बुधवारी सकाळी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल आहे. त्यांना थोडा त्रास होऊ लागल्याने दिल्लीतील चाणक्यपूरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुदास कामत हे ६३ वर्षांचे होते.

काँग्रेसमध्ये त्यांनी अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पडल्या आहेत तसेच महत्वाची पद सुद्धा भूषवली आहेत. मुंबई काँग्रेसच्या पक्षवाढीत त्यांचा महत्वाचा वाटा होता. त्यांच्या निधनाने मुंबई तसेच महाराष्ट्र काँग्रेससाठी मोठे नुकसान मानलं जात आहे. दिल्लीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले काँग्रेसमध्ये ओळखले जात होते.

मुंबई काँग्रेस अध्यक्ष ते केंद्रीय मंत्री पद असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. परंतु मागील काही वर्षांपासून ते काँग्रेस पक्ष नेतृत्वावर नाराज होते. तसेच अनेक वेळा त्यांचा संजय निरुपम यांच्याशी विकोपाचा वाद झाला होता आणि ते पक्षपासून फारकत घेण्याच्या तयारीत होते. परंतु ते शेवट पर्यंत काँग्रेसवासीच राहिले.

हॅशटॅग्स

#Congress(290)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या