21 November 2019 3:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

भाजपात जाणं धोक्याचं ठरू शकतं, राष्ट्रवादीतच राहण्याची कार्यकर्त्यांची उदयनराजेंना विनंती

NCP, MP Udayanraje Bhosale, Satara MP Udayanraje Bhosale, BJP, Maharashtra Assembly Election 2019

पुणे: राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशामध्ये नवा ट्विस्ट निर्माणा झाला आहे. भाजपमध्ये जायचं की राष्ट्रवादीत राहायचं, यासाठी उदयनराजेंनी आज पुण्यात एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीनंतर उदयनराजे यू-टर्न घेत राष्ट्रवादीतच राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.

‘आहोत तिथंच चांगलं आहे. भाजपमध्ये जाणं धोक्याचं ठरू शकतं,’ असं म्हणत जवळच्या कार्यकर्त्यांनी उदयनराजेंना राष्ट्रवादीतच राहण्याची विनंती केली आहे. त्यामुळे उदयनराजेंनीही भाजप प्रवेशाचा फेरविचार करण्यास सुरुवात केली असून ते राष्ट्रवादीतच राहतील, अशी शक्यता आहे. याबाबत एका मराठी वृत्तवाहिनीने वृत्त दिलं आहे. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले भाजप प्रवेश टाळू शकतात असं म्हटलं जातं आहे.

दरम्यान, खासदार उदयनराजेंनी आद्यापपर्यंत पक्ष सोडून जाण्याची भाषा केलेली नाही. त्यामुळे ते राष्ट्रवादीमध्येच आहेत त्यामुळे त्यांचे मत परिवर्तन करण्याचा प्रश्नच येत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले होते. आमचे निष्ठावंत नेते आम्ही तुमच्यासोबत आहोत असे आम्हाला सांगत असताना माध्यमेच त्यांच्यावर शंका उपस्थित करीत आहेत असेही ते यावेळी म्हणाले होते. काही दिवसांपासून खासदार उदयनराजे भोसले भारतीय जनता पक्षामध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, नवाब मलिक, फौजिया खान तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकी दरम्यान जयंत पाटील यांनी पत्रकाराशी संवाद साधला असता ते स्पष्टीकरण आधीच दिलं होतं.

हॅशटॅग्स

#Udayanraje Bhosale(25)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या