28 March 2023 12:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Khadim India Share Price | या कंपनी व्यवस्थापनतील फेरबदलांमुळे हा शेअर फोकसमध्ये आला, गुंतवणूक करावी का? Stocks To Buy | स्वस्त शेअर आश्चर्यकारक परतावा, किंमत 100 रुपयांपेक्षा ही कमी, अल्पावधीत मिळणार 60 टक्के परतावा, लिस्ट सेव्ह करा SIP Calculator | 1000 रुपयांच्या एसआयपीने 50 लाख मिळतील, एसआयपी कॅल्क्युलेटरने समजून घ्या फायदा New Tax Calculator | पगार वार्षिक 10 लाख रुपये, नवीन विरुद्ध जुनी टॅक्स व्यवस्था, किती टॅक्स भरावा लागेल पाहा PPF Calculator | जर PPF मध्ये दरमहा 10,000 रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीला किती मोठी रक्कम मिळेल? गणना समजून घ्या ITR Filing 2023 | 1 एप्रिलपासून करदात्यांना ITR फाईल करता येणार, कोणते नवे फायदे मिळतील पहा SIP Calculator | स्वतःच 1 कोटींचं घर घ्यायचं असल्यास किती SIP करून शक्य होईल? फायद्याचं गणित समजून घ्या
x

मनसुख हिरेन यांची हत्या सचिन वझेंनी केल्याचा फडणवीसांकडून संशय | अधिवेशनात गोंधळ

Devendra Fadnavis, Sachin Vaze, Mansukh Hiren

मुंबई, ०९ मार्च: मनसुख हिरेन यांच्या हत्येवरून विधानसभेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आज जोरदार खडाजंगी झाली. यामध्ये विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांचे तक्रार अर्ज जशास तसे वाचून दाखवले. विमला हिरेन यांना संशय आहे, की एनकाउंटर स्पेशलिस्ट सचिन वझे यांनीच मनसुख यांची हत्या केली. देवेंद्र फडणवीस यांनी हे वाचताच सभागृहात गदारोळ उडाला. तर सत्ताधाऱ्यांनी प्रकरणाचा तपास एनआयएकडे गेल्यामुळे भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. अशात सभागृहाचे कामकाज 4 वेळा तहकूब कारावे लागले.

मुंबईला हादरावून सोडणाऱ्या मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात खळबळजनक दावा केला आहे. मनसुख हिरेन यांची हत्या सचिन वाझे यांनी केल्याचा संशय फडणवीस यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे अधिवेशनात एकच खळबळ उडाली.

देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणा मुद्दा उपस्थितीत केला आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांची पत्नी विमला यांचा पोलीस जबाबच सभागृहात वाचून दाखवला. “वझेंना 201 कलमाखाली अटक का झाली नाही? वझे यांना कोण वाचवत आहे?” असा सवाल यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

सभागृहात बोलताना फडणवीस म्हणाले, “मी जबाब वाचून दाखवतो. वरील एकंदर परिस्थितीवरुन, माझ्या पतीचा खून झाला असावा अशी माझी खात्री आहे. हा खून सचिन वाझेंनी केला असावा असा माझा संशय आहे. म्हणून सदर घटनेबाबत सखोल चौकशी व्हावी. यामध्ये अजून दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली म्हणजे 2017 चा एफआयआर आहे. यानुसार दोन लोकांनी 40 लाखांची खंडणी मागितल्याचा एफआयआर आहे. यात दोन लोकांनी अटकपूर्व जामीन घेतला. यातील एकाचे नाव धनंजय विठ्ठल गावडे तर दुसऱ्याचे नाव सचिन हिंदुराव वझे असे आहे.”

दरम्यान, मनसुख हिरेन प्रकरणात विरोधी पक्ष आक्रमक झाल्यानंतर दादरा नगर हवेलीमधील अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी केली. त्यानंतर सभागृहात गोंधळ झाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज काही वेळासाठी तहकूब करावे लागले.

 

News English Summary: BJP’s Leader of Opposition Devendra Fadnavis has made a sensational claim in the budget session today in the case of Mansukh Hiren’s death that shook Mumbai. Fadnavis suspects that Sachin Vaze killed Mansukh Hiren. His claim caused a stir in the convention.

News English Title: Devendra Fadnavis suspects that Sachin Vaze killed Mansukh Hiren news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(709)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x