BMC Election 2022 | मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजप-मनसे नेत्यांच्या बैठका, मनसेला साध्य काय होणार?
BMC Election 2022 | बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात आणखी एक राजकीय बदल आकाराला येताना दिसत आहे. निवडणुकीसाठी युती करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. मात्र, याबाबत त्याबाबत दोन्ही पक्षांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण वारंवार होणाऱ्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांच्या मीटिंग्जमुळे असे संकेत मिळत आहेत.
मंगळवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर जाऊन भेट घेतली. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनीही राज यांची भेट घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली होती. मात्र, मनसेचे प्रमुख राज ठाकरे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी मलबार निवासस्थानी पोहोचले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि राज यांचा पक्ष यामुळे सेनेची मराठी व्होट बँक आपली होऊ शकते, असा भाजपचा विश्वास असल्याचं बोललं जातंय. भाजपाला मुंबई महानगरपालिका स्वतःकडे हवी असून त्यासाठी मराठी मतांमध्ये फूट पाडण्यासाठी मोठ्या हालचाली सुरु असल्याचं म्हटलं जातंय.
मनसेसाठी नेहमीप्रमाणे नुकसान आणि भाजपसाठी फायदेशीर ठरणार :
महापालिकेच्या निवडणुकीबाबत दोन्ही पक्षांमध्ये सध्या प्राथमिक टप्प्यात चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपाला केवळ राज ठाकरेंमधील एक मजबूत वक्ता वापरून घायचा आहे, जो आक्रमकपणे उद्धव ठाकरे आणि एमआयएम हिंदुत्वावरून हल्ला करू शकेल. परिणामी माध्यमांवर धार्मिक मुद्दे केंद्रस्थानी राहतील आणि सामान्य लोकांचे मूळ मुद्दे दडवता येतील असं भाजपच्या धुरंदरांना वाटतंय.
भाजपच्या एका नेत्यानं यावर काय म्हटलं :
राज ठाकरेंच्या मनसेला महानगरपालिकेत जागा जिंकता येणार नाहीत, पण भाजपला हव्या असलेल्या मुद्यांवर त्यांनी घेतलेल्या सभांमुळे महाविकासआघाडीविरोधात धार्मिक वातावरण निर्मिती होण्यास मदत होईल,” असं भाजपच्या एका नेत्यानं या वृत्तावर नाव न छापण्याच्या अटीवर माहिती दिली. मनसे प्रमुखांच्या १०-१२ सभा घडवून आणायच्या आणि धार्मिक मुद्दे धगधगत ठेवायचे जे भाजपाला फायदेशीर ठरू शकतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मनसेकडे स्वतःच्या पारंपरिक किंवा आकडेवारीत मोठा मतदार नाही, मात्र मीडिया त्यांना कव्हर करत असल्याने केवळ तोच मुद्दा भाजपाला कॅश करायचा असं त्यांनी म्हटलं.
निवडणूक समीकरणांवर दोन्ही पक्ष काय म्हणतात :
मनसेच्या एका पदाधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, “मनसेला महापालिकेची निवडणूक लढवायची आहे, पण भाजप आणि शिंदे गटाशी युती करून कोणाशी तरी युती असणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे . दुसरीकडे, भाजप पक्षाच्या आणखी एका नेत्याने म्हटले की, “राजसाहेब भाजपसमोर शरण येणार नाहीत. ते त्यांच्या अटींवर निवडणूक लढवतील. ‘एकूण २२७ जागांपैकी भाजप मनसेला २५-३० जागा देऊ शकते, कारण त्यांना शिंदे गटालाही सामावून घ्यावे लागणार आहे,’ असे भाजपच्या रणनीतिकाराने म्हटले आहे.
मनसेला फायदा होणार :
महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत भाजपला 82 जागा मिळाल्या होत्या. तर शिवसेनेच्या बाबतीत हा आकडा 84 वर होता. त्यावेळी मनसेने 7 जागा जिंकल्या होत्या. मात्र, त्यानंतर दोनच वर्षांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेला केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला. अशा परिस्थितीत राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा पाय रोवण्यासाठी मनसेसमोर ही संधी ठरू शकते असं मनसेच्या नेत्यांना वाटतंय. पण राजकीय तज्ज्ञांना मनसे निकालाअंती काही करू शकेल असं वाटत नसल्याचं मत व्यक्त केलंय. उलट शिवसेनेवरील टीकेमुळे त्यांची उरली सुरली मतं देखील शिवसेनेकडे जातील आणि शिंदे गट काही जिंकेल पण त्यामुळे मनसेचं पुढील राजकारण संपुष्टात येईल असा अंदाज बांधला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: BMC Election 2022 MNS Chief Raj Thackeray meeting with BJP leaders check details 31 August 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News