26 May 2022 8:44 PM
अँप डाउनलोड

पालघर लोकसभा: बहुजन विकास आघाडीचा 'रिक्षा' चिन्हावर स्वार होत प्रचार?

Hitendra Thakur, Bahujan Vikas Aghadi, Palghar

पालघर : बहुजन विकास आघाडीला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर धक्का बसला असला तरी त्याचा दुसराच अप्रत्यक्ष फायदा होण्याची शक्यता आहे, ज्याचा कोणी विचार सुद्धा केला नसावा. बहुजन विकास आघाडीचं ‘शिट्टी’ हे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाने जरी गोठवलं असलं तरी, त्यांना देण्यात आलेलं ‘रिक्षा’ चिन्ह त्यांना अधिक फायदा देईल अशी शक्यता आहे.

पालघर लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा क्षेत्रात रिक्षा हे प्रत्येकाशी निगडित असलेलं प्रवासाचं साधन असल्याने, बहुजन विकास आघाडीला मिळालेलं नवं चिन्हं देखील जाहिरात तज्ज्ञांच्या मते अधिक फलदायी ठरू शकत. विशेष म्हणजे अगदी मतदानाच्या दिवशी देखील हेच चिन्हं प्रत्येक मतदाराच्या डोळ्यासमोर असणार आहे. तसेच विरोधक देखील म्हणजे शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवाराची प्रचार यंत्रणादेखील त्याच रिक्षावर स्वार होऊन प्रचार करतील.

याविषयी आम्ही जेव्हा काही जाहिरात तज्ज्ञांशी सविस्तर चर्चा केली तेव्हा एक गोष्ट त्यांनी मांडली आणि ती म्हणजे जर बहुजन विकास आघाडीने ‘रिक्षा’ या चिन्हाद्वारे विरोधकांना नामोहरम करण्यासाठी ‘निगेटिव्ह मार्केटिंगचा’ वापर करण्याचे तंत्र आत्मसात केले तर त्याचा प्रचंड फायदा बहुजन विकास आघाडीला रिक्षा या निवडणूक चिन्हाने होऊ शकतो. प्रत्यक्ष मैदानावर आणि समाज माध्यमांचा नियोजनबद्ध वापर केल्यास जे यश शिटी’ने देखील दिलं नाही ते ‘रिक्षा’मुळे प्राप्त करता येऊ शकतं, असं जाहिरात तज्ज्ञांनी मत मांडलं.

हॅशटॅग्स

#Shivsena(1153)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x