29 May 2022 5:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
x

विधानसभेला राज ठाकरेंशी चर्चा होऊ शकते : शरद पवार

NCP, Sharad Pawar

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, एनसीपीच्या आघाडीला अनुकूल वातावरण दिसत आहे. आपण अनेक लोकसभा निवडणुका पाहिल्या, यापुर्वी देशाचा पंतप्रधान महाराष्ट्रात एक-दोन वेळा प्रचारासाठी येत होते. आता नरेंद्र मोदी यांना दर २-३ दिवसांनी महाराष्ट्रात यावे लागते, यावरून येथील राजकीय हवा बदलत असल्याचे सूचक विधान एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले उमेदवार लोकसभेत उभे केलेले नाहीत. नरेंद्र मोदी व अमित शहा हे देशाच्या हितादृष्टीने घातक असल्याचे सांगत त्यांना हटविण्याचा एककलमी कार्यक्रम त्यांनी घेतला आहे. लोकसभेला ते आघाडीसोबत नाहीत, विधानसभेला त्यांच्याशी चर्चा होऊ शकते, असेही पवार यांनी सांगितले.

शरद पवार म्हणाले, मागील निवडणूकीत दिलेली आश्वासने नरेंद्र मोदी सरकारने न पाळल्याने सामान्यांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे रोज एक प्रचाराचे मुद्दे बाहेर काढत आहेत. व्यक्तीगत हल्ले करून त्यातून प्रतिसाद मिळत नसल्याने आता त्यांनी काश्मीरमध्ये काँग्रेस फुटीरवाद्यांसमवेत गेल्याची टीका करत आहेत. त्यांच्या टीकेचा रोक जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याकडे आहे, पण ते आमचे घटकपक्षच नाहीत.

उलट भारतीय जनता पक्षालाच त्यांच्यासमवेत सरकारमध्ये होते. ३-४ वर्षापुर्वी मोदी यांनी काश्मीरच्या विकासाचा चांगला कार्यक्रम मांडल्याने त्याचे स्वागत केले. पण त्यातील एकाही गोष्टीची अंमलबजावणी झाली नसल्याने येथील तरूण पिढी संतप्त आहे. जम्मू-काश्मीर हे संवेदनशील राज्य असल्याने कोणताही निर्णय संयमाने व लोकांचे हित पाहूनच घ्यावा लागतो. त्यामुळे नरेंद्र मोदी यांची टीका गांभीर्याने घेण्यासारखी नसते.

वंचित बहुजन आघाडीचा अजेंडा काय माहिती नाही, त्यामुळे त्याचा फटका कोणला बसेल हे आताच सांगता येणार नाही. पण जाणीवपुर्वक मतविभागणी करण्यासाठी काही मंडळींनी केलेला हा कार्यक्रम असू शकतो. असेही पवार यांनी सांगितले.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(424)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x