फडणवीसांनी सायबर गुन्हे शाखेत ब्रिजेश सिंह यांना आणून स्वतःच्याच मंत्र्यांवर पाळत ठेवलेली - राष्ट्रवादी
मुंबई, १९ मार्च: सचिन वाझे प्रकरणावरुन महाविकासआघाडी सरकारला कोंडीत पकडणाऱ्या आणि आक्रमक झालेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गंभीर आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ते मुख्यमंत्री असताना आपल्याच सरकारमधील मंत्र्यांवर पाळत ठेवण्याचे उद्योग केले. तसेच, फडणवीस यांनी मुख्यमंत्री कार्यालयात नेमलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित सात विशेष कार्य अधिकाऱ्यांच्या वेतनावर दरमहा 7 लाख 70 हजार रुपये खर्च होत होते, असाही दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हा दावा करण्यात आला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी माहिती महासंचालकपदावर पोलिस खात्यातील, त्यातही सायबर गुन्हे शाखेच्या ब्रिजेश सिंह यांना आणून आपल्याच सरकारमधील मंत्र्यांवर पाळत ठेवण्याचे उद्योग केले होते. तेच आता पोलिस अधिकाऱ्यांच्या गैरवापरावर प्रवचने झोडत आहेत.@Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
— NCP (@NCPspeaks) March 18, 2021
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘देवेंद्र फडणवीस यांनी माहिती महासंचालकपदावर पोलिस खात्यातील, त्यातही सायबर गुन्हे शाखेच्या ब्रिजेश सिंह यांना आणून आपल्याच सरकारमधील मंत्र्यांवर पाळत ठेवण्याचे उद्योग केले होते. तेच आता पोलिस अधिकाऱ्यांच्या गैरवापरावर प्रवचने झोडत आहेत.’
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री कार्यालयात नेमलेल्या रास्वसंघाशी संबंधित सात विशेष कार्य अधिकाऱ्यांच्या वेतनावर दरमहा ७,७०,००० रु खर्च होत होते.त्याहून महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाचे कामकाज सरकारबाहेरील खासगी लोकांकडे देऊन त्यांनी सरकारी गोपनीयता धाब्यावर बसवली होती.
— NCP (@NCPspeaks) March 18, 2021
दुसऱ्या ट्विटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे, ‘देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री कार्यालयात नेमलेल्या रास्वसंघाशी संबंधित सात विशेष कार्य अधिकाऱ्यांच्या वेतनावर दरमहा ७,७०,००० रु खर्च होत होते.त्याहून महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाचे कामकाज सरकारबाहेरील खासगी लोकांकडे देऊन त्यांनी सरकारी गोपनीयता धाब्यावर बसवली होती.’
News English Summary: The Nationalist Congress Party (NCP) has leveled serious allegations against opposition leader Devendra Fadnavis, who has been embroiled in an aggression against the Mahavikasaghadi government over the Sachin Waze case. When he was the Chief Minister, Devendra Fadnavis tried to keep an eye on the ministers in his own government
News English Title: NCP made serious allegations on Fadnavis regarding misuse of Police department news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News