14 April 2024 1:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | असे शेअर्स निवडा! 3 रुपयाच्या शेअरने 1 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास बचत योजना, मिळेल 7.70 टक्के व्याज आणि मोठा परतावा मिळवा Force Gurkha | फोर्सची गोरखा SUV लाँचिंगसाठी सज्ज, थेट जिम्नी, थार सारख्या वाहनांशी स्पर्धा करणार, फीचर्स जाणून घ्या SBI Amrit Kalash Scheme | SBI बँकेची खास FD योजना, मिळेल वार्षिक 7.60 टक्के व्याज, बचतीसाठी बँकेत लाईन KTM RC 200 | लोकप्रिय KTM मोटरसायकलवर 5 वर्षांची वॉरंटी, रोड साइड असिस्टन्स सर्व्हिस फ्री Mangal Rashi Parivartan | मंगळ राशीपरिवर्तनाने 'या' 4 राशींचे भाग्य चमकणार, तुमची नशीबवान राशी आहे का? SBI Mutual Fund | एसबीआयची प्रसिद्ध म्युच्युअल फंड योजना, दरमहा 5000 रुपयांची SIP देईल 49 लाख रुपये
x

परभणीत मराठा आंदोलन चिघळलं, ६ बसेस आणि पोलीस व्हॅन सुद्धा जाळल्या

परभणी : मागील २ वर्षापूर्वी शांततेत पार पडलेले मराठा समाजाचे मोर्चे आता हिंसक वळण घेऊ लागले आहेत. मराठा समाजाच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी गंगाखेडमध्ये ४ खासगी गाड्या, ५ बसेस आणि पोलिसांची व्हॅन जाळली आहे.

मराठा क्रांती मोर्चा आता खूपच आक्रमक होऊ लागल्याचे राज्यभर दिसू लागले आहे. त्यामुळे सरकारच्या डोकेदुखीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार गंगाखेड परिसराला सध्या दंगलीचं स्वरुप आलं आहे. त्यामुळे गंगाखेड बंदची हाक हिसंक वळणार गेली आहे.

या वृत्ताचे रिपोर्टींग करणाऱ्या दोन वार्ताहारांना सुद्धा दुखापत झाली आहे आणि त्या अनुषंगाने मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सध्या जखमींना जवळच्या स्थानिक इस्पितळात दाखल करण्यात आलं आहे आणि प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे अशी माहिती देण्यात आली आहे.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x