12 December 2024 1:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त
x

Kanhaiya Kumar | भाजप मला तुकडे-तुकडे गँग बोलते आणि मीच भाजपचे तुकडे-तुकडे करणार - कन्हैया कुमार

Kanhaiya Kumar

मुंबई, ०१ ऑक्टोबर | सीपीआयचा माजी नेता कन्हैया कुमार याने काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला होता. त्याआधी कन्हैय्या कुमार (Kanhaiya Kumar) यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. तसेच आमदार जिग्नेश मेवानी यांच्या प्रवेशामुळे गुजरातच्या राजकारणाची तर कन्हैया यांच्या बिहारच्या राजकारणाची समीकरणे बदलू शकतात, असे राजकीय विश्लेषकांना वाटते.

The BJP calls me a ‘Tukde Tukde Gang’ and I will tear the BJP to Tukde. With elections looming, there are indications that Kanhaiya Kumar will blow the trumpet against the BJP :

या प्रवेशाबाबत अनेक काँग्रेस नेत्यांना विश्वास वाटतोय, की कन्हैयामुळे पक्षाला बिहारमध्ये सावरण्याची संधी मिळेल. बिहारमध्ये गेल्या तीन दशकांपासून काँग्रेस काही खास काम करू शकली नाही. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत, मित्रपक्ष आरजेडी आणि सीपीआयच्या (एमएल) तुलनेत काँग्रेसच्या जागा फारच कमी आल्या. काँग्रेसने लढवलेल्या ७० पैकी केवळ १९ जागा जिंकल्या. आरजेडीने १४४ जागांपैकी अर्ध्याहून अधिक जागा जिंकल्या, तर सीपीआयने (एमएल) १९ पैकी १२ जागा जिंकल्या जिथे त्यांनी उमेदवार उभे केले होते.

आता काँग्रेस प्रवेशानंतर कन्हैया कुमारने भारतीय जनता पक्षावर थेट हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना कन्हैया कुमार म्हणाला की, ‘भाजप मला ‘तुकडे-तुकडे गॅंग’ बोलते आणि मीच भाजपचे तुकडे-तुकडे करणार’. आता निवडणूक तोंडावर आल्याने कन्हैया कुमार भाजप विरोधात रणशिंग फुंकणार असे संकेत मिळू लागले आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Kanhaiya Kumar now started targeting BJP after joining congress party.

हॅशटॅग्स

#KanhaiyaKumar(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x