10 May 2024 9:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 11 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 11 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या NTPC Share Price | PSU एनटीपीसी शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, फायद्याची बातमी आली, स्टॉक तेजीत धावणार RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार Rattanindia Power Share Price | शेअर प्राईस 11 रुपये! 4 दिवसात 20% परतावा दिला, तज्ज्ञांचा पेनी स्टॉक खरेदीचा सल्ला Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस जाहीर Penny Stocks | चिल्लर गुंतवून शेअर्स खरेदी करा, गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स
x

Special Recipe | पौष्टिक आणि झणझणीत मुंग डाळ कटलेट रेसिपी - नक्की पहा

Moong Dal Cutlet recipe in Marathi

मुंबई, ०१ ऑगस्ट | घरच्याघरी सोप्या रेसिपी अनेक आहेत. मात्र त्यातही एक वेगळीच मज्जा असणं देखील महत्वाचं आहे. घरी आपण भजी सारखे पदार्थ वरचेवर बनवत असतो. मात्र आज आपण पाहणार आहोत पौष्टिक आणि झणझणीत मुंग डाळ कटलेट रेसिपी. चला तर पाहूया संपूर्ण रेसिपी कशी बनवायची ते;

संपूर्ण साहित्य:
६ टेबलस्पून मुग डाळ (रात्रभर भिजवुन ठेवलेली)
७ ते ८ पाकळ्या लसुन
2 टेबलस्पून कापलेली कोथींबीर
1 टीस्पून जिरे
2 टीस्पून धने पावडर
५ ते ६ मिरच्या
1 कापलेला कांदा
तळायला तेल
७ ते ८ कढीपत्त्याचे पाने
1/2 टीस्पून हींग
चवीनुसार मिठ

संपूर्ण कृती:
१. सर्व प्रथम मुग डाळ पाण्याने धुवून घ्या व मिक्सर मध्ये जाडसर वाटा. जास्त बारीक करू नका. त्यात कांदा बारीक कापलेला, जिरं, मिरच्या,लसुन पाकळ्या कोथिंबीर मिक्सर मध्ये जाडसर वाटलेला हळद, कढीपत्त्याचे पाने बारीक चीरलेली व चविनुसार मिठ घालून मिश्रण हाताने कालवावे. सोबत थोडं कढईत गरम केलेलं तेल घाला यामुळे वडे कुरकुरीत होतील.
२. त्याचा लिंबाएवढा गोळा घेऊन कटलेट तळहातावर थापावे.कढईत तेल गरम झाल्यावर कटलेट गॅसच्या मंद आचेवर त्यात चांगले सोनेरी होईपर्यंत तळुन घ्या.गरमागरम कटलेट ताकाच्या कढीसोबत किंवा हिरव्या मिरचीच्या चटणीसोबत खायला द्या.
३. गरमागरम कटलेट ताकाच्या कढीसोबत किंवा हिरव्या मिरचीच्या चटणीसोबत खायला द्या.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Recipe Title: Moong Dal Cutlet recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x