18 May 2024 10:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | तुमच्या कुटुंबासाठी 'या' 3 पोस्ट ऑफिस योजना वरदान ठरतील, फायदे जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांसाठी खास SIP योजना नोट करा, महिना बचत देईल 1 कोटी 4 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा
x

Health First | मानदुखीचा त्रास आहे? | हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा

Home remedies on neck pain

मुंबई, ०१ ऑगस्ट | मान दुखत असेल तर थोडीही हालचाल त्रासदायक ठरु शकते. या त्रासामुळे झोपताना, बसताना आणि उठून बसताना देखील त्रास होतो. मानेचा त्रास हा कोणत्याही भागावर होवू शकतो. त्यात स्नायू, नस, हाडे, सांधेजोड आणि हाडादरम्यान असलेल्या डिस्कचा समावेश असतो. कधी कधी दुखणे एवढे बळावते की मान सहजपणे कोणत्याच दिशेला वळवू शकत नाही.

स्मार्टफोन पाहताना, पुस्तक वाचताना आपली मान सरळ खाली जाते; परंतु कम्प्युटरवर काम करत असताना स्क्रीनवर नजर स्थिर असल्यामुळे आपली मान खाली न जाता हनुवटीच्या दिशेने पुढे आलेली असते. त्यामुळे मानेचा एक विशिष्ट कोन तयार होतो आणि त्या स्थितीमध्ये आपण कमीत कमी चार ते सहा तास काम करत असतो. या स्थितीमुळे ‘पॅरा स्पायनल मसल्स’, जे ‘डीप मसल्स’ आहेत, ते अवघडलेल्या स्थितीमध्ये तासन् तास राहिल्यामुळे मानेचे स्नायू आखडतात. परिणामी, मान अवघडणे, मान दुखणे, खांद्यावर, पाठीवर सूज येणे, हात दुखणे, हाताला मुंग्या येणे अशा तक्रारी सुरू होतात.

मानेवर बर्फ फिरवाः
मानेचे दुखणे आणि सूज यापासून आराम मिळण्यासाठी दिवसातून अनेकदा पाच मिनिटांपर्यंत बर्फ मानेवर फिरवा. एवढेच नाही मानदुखीपासून आराम मिळवण्यासाठी गरम पाण्याने आंघोळ करा. दुखणार्या जागी हिटिंग पॅडचा वापर करा. नक्कीच आराम मिळेल.

मानेचा मसाज:
मानेवर मसाज करा महानारायण तेलासारख्या वेदनाशामक तेलाने मानेचा मसाज करा. आपली मान आणि पाठीच्या स्नायूंना आराम मिळेल. दुखणे कमी होईल.

सैंधव मीठाचा वापरः
मानदुखीचा त्रास कमी करण्यासाठी सैंधव मीठ हे औषधाप्रमाणे काम करते. त्याचा उपयोग स्नायूचे दुखणे आणि सूज कमी करण्यासाठी करता येतो. त्याच्या वापराने मानदुखीपासून आराम मिळेल. एका बाथटबमध्ये कोमट पाण्यात सैंधव मीठ टाका. या पाण्यात मानेपर्यंत दहा ते पंधरा मिनिटे बसा. आपल्याला आराम पडेल.

मानेचा व्यायाम:
* काम करताना दर अर्ध्या-एक तासानंतर आहे त्याच जागेवर मानेचे हलके व्यायाम करावेत. मानेची हालचाल करणे खूप गरजेचे आहे.

* मान डावीकडे वळवावी, हनुवटी डाव्या खांद्याच्या दिशेने वळवावी आणि ती खांद्याच्या रेषेत आणण्याचा प्रयत्न करावा. या स्थितीमध्ये पाच श्वास थांबावे; तशीच क्रिया उजव्या बाजूनेही करावी. दोन्ही बाजूंना मान वळविण्याच्या या क्रियेची तीन आवर्तने करावीत.

* डावा कान डाव्या खांद्याच्या दिशेने खाली आणावा, पाच श्वास थांबावे; तसेच उजवा कान उजव्या खांद्याच्या दिशेने खाली आणावा. दोन्ही मिळून हा प्रकार तीनदा करावा.

* ऑफिस चेअर’वर दोन्ही हात डोक्याच्या मागे ठेवून मान सावकाश वर उचलावी. दोन्ही हातांच्या मदतीने डोक्याचा मागचा भाग हातावर दाबावा. असे दहा वेळेस करावे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Home remedies on neck pain in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x