16 December 2024 1:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

राज्यातील ५२ कोरोना बाधितांपैकी ४१ जणांना कोणतीही लक्षणे नाहीत: आरोग्यमंत्री

Health Minister Rajesh Tope, Corona Crisis

मुंबई, २० मार्च:  मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई आणि ठाणे येथील कोरोना विषाणू संसर्गित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या ठिकाणी आणखी कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. राज्यात आणखी तिघांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे. तीनपैकी प्रत्येकी एक जण पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबईतील आहे. या तिघांची प्रकृती स्थिर आहे. राज्यात कोरोना विषाणूबाधितांची संख्या आता ५२ झाली आहे असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

आज आरोग्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत राज्यातील कोरोनाविषयक परिस्थितीची माहिती दिली. ‘राज्यातील जे कोरोनाग्रस्त आहेत त्यापैकी ५ जणांना डिस्चार्ज देण्याची शक्यता आहे. मात्र त्यांना आणखी काही दिवस होम क्वारेंटाइन राहावं लागणार आहे. त्यामुळे मी राज्यातील जनतेला सांगू इच्छितो की, नागरिकांना घाबरून जाऊ नये. कोरोना झाल्यानंतरही रुग्ण बरे होतात. राज्यातील १०३५ रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यांची टेस्ट करण्यात आली. त्यापैकी ९७१ रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. काल आणखी पाच जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. अतिदक्षता विभागातील उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत करत आहे’ असं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

राज्यात कोरोनाचे आज दिवसभरात एकूण ४ नवीन रुग्ण आढळले. एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या ५२ झाली आहे. ४ पैकी मुंबई येथील २ तर पुणे व पिंपरी चिंचवड येथे प्रत्येकी १ रुग्ण आहे. सध्या रुग्णालयात भरती असलेल्या करोना बाधित ४१ जणांना कोणतीही लक्षणे नाहीत तर ८ जणांना सौम्य लक्षणे आहेत.

आरोग्यमंत्री टोपे यांच्या पत्रकार परिषदेतील १० महत्वाचे मुद्दे
१. राज्यात सध्या १०३६ लोक विलगीकरण कक्षात आहेत.
२. आतापर्यंत ९७१ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
३. कोरोनामुक्त झालेल्या ५ जणांना डिस्चार्ज दिला जाईल.
४. सध्या ६ लॅबमधून चाचणी होत आहे. आणखी २ वाढतील. पुढच्या १० दिवसांत १२ लॅबमधून रोज २४०० टेस्ट केल्या जाऊ शकतील.
५. होम क्वारंटाईन केलेल्या लोकांनी सार्वजनिक वाहतूक सेवेचा उपयोग करू नये
६. परदेशातून येणाऱ्या व्यक्तींची तपासणी करून निगेटिव्ह असलेल्यांना राज्यात आणलं जाईल. त्यांना क्वारंटाईनसाठी तुर्भे इथं अनिल अंबानी यांच्या रुग्णालयात ठेवण्यात येईल.
७. परदेशातून विशेषतः अरब देशातून येणाऱ्या सुमारे ३० हजार लोकांना पूर्ण तपासणी करून आणि काळजी घेऊन भारतात आणलं जाईल.
८. गर्दी कमी करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज निर्णय जाहीर करतील.
९. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनाला जनतेनं प्रतिसाद द्यावा.
१०. पंतप्रधान मोदी आज विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांशी संध्याकाळी ४ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.

 

News English Summery:  The number of corona virus infected patients in Mumbai, Pune, Pimpri-Chinchwad, Navi Mumbai and Thane is increasing day by day. Therefore, there is a need to make more difficult decisions. Chief Minister Uddhav Thackeray will take a decision in this regard. Three more have been reported to be infected with corona virus in the state. Each one of the three is from Pune, Pimpri-Chinchwad and Mumbai. The nature of these three is stable. Health Minister Rajesh Tope said that the number of coronary outbreaks in the state has now increased to 52. Health Minister informed about Corona situation in the state at a press conference today. ‘Out of the coroners affected in the state, 5 are likely to be discharged. But they have to stay home quarantine for a few more days. So I want to tell the people of the state that the citizens should not be scared. Patients recover even after corona. In the state, 1035 patients were kept in isolation room. They were tested. Of those, 971 patients were reported negative. Yesterday, five more reports came out negative and will be discharged. The Health Minister has said that the state government is spending the entire cost of the treatment in the High Vigilance Department under the Mahatma Jotiba Phule Health Scheme.

 

News English Title:  Story Maharashtra Health Minister Rajesh Tope shared status details of Corona Crisis in Maharashtra News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x