आगामी निवडणुका ३ महिने पुढे ढकलण्याची निवडणूक आयोगाकडे विनंती
मुंबई, १६ मार्च : जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे. महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या ३८ वर पोहोचली आहे. आता खबरदारी म्हणून राज्यातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहे, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. तसंच, महापालिका आणि ग्रामपंचायता निवडणुका ३ महिने पुढे ढकलण्याचा निर्णय झाला असून तशी शिफारस निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.
कोरोनाविषयी आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राजेश टोपे यांच्या उपस्थित सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सोमवारी बैठक झाली. या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा ३८ वर पोहोचला आहे. परदेशातून आलेल्या १२ रुग्णांमुळे इतर लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. आता कोरोंटाईन केलेल्यांवर निळ्या शाईचे शिक्के मारण्यात येणार आहेत, असे राजेश टोपे यांनी सांगितले.
Maharashtra: CM Uddhav Thackeray and Health Minister Rajesh Tope, along with Chief Secretary of the state, are holding a review meeting at CM’s official residence. All district magistrates are joining via video-conferencing. #Coronavirus pic.twitter.com/PGLjRu2o9e
— ANI (@ANI) March 16, 2020
तसंच, राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि राज्यातील सर्व विद्यापीठ परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात येणार आहे. उद्यापासून राज्यातील सर्व विद्यापीठ महाविद्यालय, इंजिनिअर यासह वेगवेगळ्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत असतील त्यांचे पेपर पुढे ढकलण्यात येणार आहे. ज्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहे त्या एप्रिल महिन्यात घेण्यात येतील, पुढील सुचना येईपर्यंत बंद राहणार आहे, असं टोपे यांनी सांगितलं.
तसेच राज्यात आगामी काळात महापालिका आणि ग्रामपंचायती निवडणुका येऊ घातल्या आहे. कोरोना व्हायरसची परिस्थितीत पाहत निवडणुका 3 महिने पुढे ढकलण्यात यावा असा निर्णय राज्य सरकारचा झाला आहे. याबद्दल निवडणूक आयोगाला तशी विनंती करण्यात आली आहे, अशी माहितीही टोपे यांनी दिली.
राज्य सरकारने खास आणि कठोर भूमिका राज्य घेतलेली नाही, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. अनावश्य ठिकाणी गर्दी होत असेल तर १४४ अंतर्गत जमाव बंदी लागू करण्याचे अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांकडे आहेत. स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन मानवतेचा दृष्टिकोन लक्षात ठेवून याबाबत निर्णय घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्याचे माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली.
News English Summery: The worldwide outbreak of corona virus has spread. In Maharashtra, the number of corona virus patients has reached 38. Now all schools in the state have been closed as a precaution, Health Minister Rajesh Tope has announced. Also, the municipality and the gram panchayat have decided to postpone the elections for three months and the same has been recommended to the Election Commission. Health Minister Rajesh Tope held a press conference on the Corona virus review meeting. You have the level of the corona virus that has reached the second level. The corps has not yet reached the third level, said Tope. Also, all schools, colleges and universities in the state will be postponed till March 31. From tomorrow, all the universities, colleges and engineers of the state will have various exams till March 31. Their papers will be postponed. The exams, which have been canceled, will be held in April and will remain closed until further notice, Health Minister Rajesh Tope said.
News English Title: Story recommendation to postpone elections for 3 months closing all schools in Maharashtra News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News