11 December 2024 8:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

पूरग्रस्तांसाठी ११० डबे घेऊन फिरणाऱ्या गरीब तावडेंच्या सौजन्याने एस्सेल वर्ल्ड ऑफर

Minister Vinod Tawde, Sangli Flood, Kolhapur Flood, Essel World

मुंबईः कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पुरग्रस्तांसाठी भाजपच्यावतीने बोरिवली विधानसभा मतदारसंघात आज मदतफेरीचे आयोजन करण्यात आले होते. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे तसेच खासदार गोपाळ शेट्टी मदतफेरीमध्ये सहभागी झाले होते. त्यांच्या समवेत बोरिवली विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना तावडे म्हणाले की, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आज आम्ही मदतफेरी सुरू केली आहे. पूरग्रस्तांसाठी निधी संकलन करण्यासाठी ११० डबे आम्ही तयार केले आहेत, प्रत्येक डब्यात जमा होणारा संकलित निधी हा मुख्यमंत्री निधीच्या माध्यमातून पुरग्रस्तांपर्यंत पोहोचणार आहे. या मदत फेरी मध्ये जमा होणारे ब्लॅंकेट असेल, बिस्कीट असेल तसेच विविध माध्यमातून मदत करणाऱ्या संस्था आहेत हे आम्ही सर्व मुख्यमंत्री निधिकडे पाठवणार आहोत. पुरग्रस्तांसाठी बोरिवलीकर नागरिक सढळ हस्ताने मदत करतील आणि पूपरिस्थितीमुळे जो बांधव दुःखातआहे व अडचणीत सापडला आहे त्याला नक्की मदत करतील अशी अपेक्षा ही तावडे यांनी यावेळी व्यक्त केली होती.

दरम्यान, कोठेही सत्तेत नसलेले छोटे पक्ष अनेक ठिकाणी स्वखर्चाने मदत करताना दिसत होते तर दुसरीकडे ५ वर्षातच देशात सर्वात श्रीमंत पक्ष होण्याचा मान पटकावणाऱ्या पक्षाचे महाराष्ट्रातील मंत्री विनोद तावडे बोरिवली मतदार संघात कटोरा घेऊन मदतफेरी काढताना दिसले. काही महिन्यापूर्वी कर्नाटकातील सरकार पाडण्यासाठी मोठी अर्थशक्ती पणाला लावली होती आणि राज्यातील नेत्यांनी कर्नाटकातील नेत्यांचे लाड पुरवण्यासाठी त्यांची मोठी पंचतारांकित सोय मुंबईत केली होती. मात्र राज्यावर नैसर्गिक आपत्ती येताच हेच राज्यातील मंत्री आणि नेते अचानक गरीब झाले आणि महागाईने भरडल्या गेलेल्या सामान्य जनतेसमोर हातात मदतीसाठी कटोरा घेऊन फिरताना दिसले.

स्वतः विनोद तावडे यांनी मोठा गाजावाजा करत स्वतःच्या मतदारसंघात मार्केटिंगची संधी हेरली आणि ११० डबे घेऊन मदतफेरीसाठी पैसे मागताना स्वतःच माईक देखील हातात घेतल्याचे पाहायला मिळाले. मात्र आता त्याच मंत्री विनोद तावडेंच्या सौजन्याने एस्सेल वर्ल्डला जाऊ इच्छिणाऱ्या मंत्रालयीन कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी खास ऑफर दिल्या जात असल्याचे फ्लेक्स थेट एस्सेल वर्ल्डने त्यांच्या फोटोसकट लावले आहेत. त्यामुळे हातात कटोरा घेऊन लोकांकडून पैसे मागणारे विनोद तावडे यांच्या सौजन्याने आता सरकारी जावयांना विशेष ऑफर दिल्या जात असल्याने, त्यांच्यावर समाज माध्यमांवर चौफेर टीका करण्यात येते आहे.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Vinod Tawde(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x