30 June 2022 7:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
बहुमत चाचणी उद्याच घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश | तत्पूर्वी मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार Motorola G42 | मोटोरोला जी 42 स्मार्टफोन भारतात लाँच होणार | 50 मेगापिक्सल कॅमेरा | किंमत आणि वैशिष्ठ्ये पहा Innova Captab IPO | इनोव्हा कॅपटॅप फार्मा कंपनी आयपीओ लाँच करणार | कंपनीचा तपशील जाणून घ्या Horoscope Today | 30 जून 2022 | तुमच्या राशींनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Drinking Water During Meals | या 5 कारणांसाठी जेवताना पाणी पिणे टाळा | वाचा ती कारणं Income Tax Return | तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल? | अधिक जाणून घ्या फ्लोअर टेस्टवेळी भाजपला पाठिंबा देण्याच्या फडणवीसांच्या मागणीला राज ठाकरेंचा होकार
x

सीडीएस हे पद लष्कर, नौदल आणि हवाई दलप्रमुखांच्या वरचं असेल?

Indian Army, Indian Navy, Indian Air Force, Chief of Defense Staff, CDS

नवी दिल्ली: लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत भारताचे पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ असू शकतात. ७३ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ नियुक्त करणार असल्याची घोषणा केली. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ संदर्भात सरकारला सल्ला देण्यासाठी एक उच्चस्तरीय अंमलबजावणी समिती स्थापन करण्यात आली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीडीएसच्या नियुक्तीसाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती नोव्हेंबरपर्यंत काम करेल. भारतीय हवाईदल प्रमुख बी.एस. धनोआ ३० सप्टेंबर रोजी निवृत्त होत आहेत. बिपीन रावत यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे. सीडीएस हे पद लष्कर, नौदल आणि हवाई दलप्रमुखांच्या वरचं असेल. भलेही ती व्यक्ती या तिन्ही दलप्रमुखांप्रमाणेच चार स्टार जनरल असेल. भविष्यात तिला ५ स्टार जनरलदेखील केलं जाऊ शकतं.

यापूर्वीच्या अनेक सरकारांनी राजकीय सहमतीअभावी सीडीएस पदासंबंधीचा निर्णय बासनात गुंडाळून ठेवला होता. त्यानंतर २०१२ मध्ये नरेश चंद्र टास्क फोर्सने चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या अध्यक्षपदाचा प्रस्ताव दिला. या समितीचा कार्यकाळ २ वर्षांचा असतो. या कमिटीत तिन्ही दलप्रमुख असतात. यातील सर्वात सिनिअर समितीचा अध्यक्ष असतो.

२३ डिसेंबर २०१६ ला आम्ही याबाबत अहवाल सादर केला होता. या अहवालाची दखल केंद्र सरकारने घेतल्याचे शेकटकर म्हणाले. या पदावरील अधिकारी तिन्ही सेनांचा प्रमुख असेल व तिन्ही सेनादलांच्या कामगिरीबाबत एकत्रीकरण करेल तसेच तिन्ही सेनादले व सरकारसोबत समन्वय साधेल. तिन्ही सेना दलांबाबतच्या सर्व बाबींचा मुख्य समन्वयक म्हणून हा अधिकारी काम करेल, असे ते म्हणाले. देशाला संरक्षणसज्ज करण्यासाठी व संभाव्य हल्ले रोखण्यासाठी विविध दूरगामी योजना आखण्यासाठी हा अधिकारी कार्यरत राहील, असे शेकटकर म्हणाले.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x