26 March 2023 5:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Scheme Balance | खुशखबर! PPF मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांच्या खात्यात 31 मार्चला पैसे ट्रान्सफर होणार, अधिक जाणून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरची 2023, 2024, 2025, 2030 मध्ये टार्गेट प्राईस किती असेल? तज्ज्ञांचं मत पहा आता निरव मोदी, ललित मोदी आणि मेहुल चोक्सी भारतात परतून स्वतःला OBC नेते घोषित करतील, भाजप त्यांचं स्वागत करेल - रवीश कुमार Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव धडाम झाले, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या SBI Bank mPassbook | पासबुक अपडेटसाठी आता SBI बँकेत जाण्याची गरज नाही, असं करा सहज ऑनलाईन अपडेट CIBIL Score | कर्जाचा EMI थकवल्याने डिफॉल्ट झाल्यावरही सिबिल स्कोर कसा सुधारू शकता पहा SIP Calculator | अशी SIP करा म्हणजे 4 वर्षांनंतर 15 लाख रुपयांची कार खरेदी करू शकाल, संपूर्ण गणित पहा
x

हा शिंदे-फडणवीस सरकारचा विकास? | मुख्यमंत्री शिंदेंना सोलापूर-धुळे महामार्गावरून वळसा घालावा लागू नये म्हणून डिव्हायडर तोडला

CM Eknath Shinde

CM Eknath Shinde | औरंगाबाद जिल्ह्यातून महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेले संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार या दोन मंत्र्यासह रमेश बोरणारे, संजय शिरसाठ, प्रदीप जैस्वाल अशा पाच आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले होते. त्यानंतर मतदारसंघात दाखल झाल्यावर या पाचही आमदारांचे जंगी स्वागत झाल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी या पाचही बंडखोरांच्या मतदारसंघात रॅली काढत, सभा घेत गर्दी खेचली होती. मात्र एकनाथ शिंदे सभा घेताना अधिक मंत्री असलेले आणि सोयीचे मतदारसंघ निवडत असल्याचं स्थानिक पत्रकार सांगत आहेत. महराष्ट्राच्या राजकरणात सभांमधून झंझावात निर्माण होईल असं एकनाथ शिंदे यांचं व्यक्तिमत्व अजिबात नाही. त्यामुळेच ते सोयीचे मतदारसंघ निवडून एक सेफ गेम खेळत असल्याचं पत्रकार आपसात बोलत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १२ सप्टेंबर रोजी औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यानिमित्त जिल्ह्यातील पैठण तालुक्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांना वळसा घालावा लागू नये, म्हणून चक्क डिव्हायडर तोडण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचा नागरी सत्कार व सभा होणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांच्या या दौऱ्याची जोरदार तयारी मंत्री संदिपान भुमरे यांनी सुरू केली आहे.

चिकलठाणा विमानतळावरून बीड बायपास मार्गे नव्या सोलापूर-धुळे महामार्गावरून मुख्यमंत्र्यांचा ताफा पैठणकडे रवाना होणार आहे. परंतु या रोडवर दुभाजक असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना वळसा घालावा लागू नये, म्हणून चक्क डिव्हायडर तोडण्यात आला आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांचा औरंगाबाद दौरा यशस्वी करण्यासाठी शिंदे गटाचे प्रमुख नेते कामाला लागले आहेत. ज्या पैठण तालुक्यात एकनाथ शिंदे यांची बैठक होणार आहे, त्या पैठणमध्ये शिंदे गटाकडून दौऱ्याच्या निमित्ताने नियोजन बैठका घेण्यात येत आहेत. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीचे गण असलेल्या सर्वच प्रमुख गावात शिंदे गटाचे महत्वाचे नेते पदाधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: CM Eknath Shinde on Auragabad Tour check details 10 September 2022.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x