23 September 2021 1:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

BREAKING | कंगना रणौतला अटक वॉरंट जारी करण्याचा न्यायाधिशांचा इशारा

Kangana Ranaut

मुंबई, १४ सप्टेंबर | गीतकार जावेद अख्तर यांनी कंगनाच्या विरोधात मानहानी याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कंगनाला न्यायालयात हजर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र आजही ती न्यायालयात दाखल झाली नाही. कंगना जर पुढील तारखेस हजर राहिली नाही तर तिला अटक वॉरंट जारी करण्यात येईल असा इशारा न्यायालयाने दिला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

कंगना रणौतला अटक वॉरंट जारी करण्याचा न्यायाधिशांचा इशारा – Judge warns Bollywood actress Kangana Ranaut to issue arrest warrant in defamation case of Javed Akhtar :

आज न्यायलयात कंगना रणौत गैरहजर राहिली. तिचे वकील ऍड सिद्दिकी यांनी न्यायालयात तिची बाजू मांडली. कंगनाला कोरोनाची लक्षणे जाणवल्यामुळे तिची चाचणी घेण्यात आली आहे. याचा अहवाल आला नसल्यामुळे ती न्यायालयात आली नसल्याचे ऍड सिद्दिकी यांनी सांगितले.

मात्र ऍड सिद्दिकी यांच्या या म्हणण्याला जावेद अख्तर यांचे वकील ऍड भारद्वाज यांनी आक्षेप घेतला. यावर न्यायालयाने कंगनाला इशारा दिला की, कंगना जर पुढील तारखेस हजर राहिली नाही तर तिला अटक वॉरंट जारी करण्यात येईल. यामुळे पुढील तारखेस कंगना न्यायालयात हजर राहणे अनिवार्य असणाार आहे. न्यायालयाने ही सुनावणी २० सप्टेंबर पर्यंत तहकूब केली.

कंगनाची याचिका न्यायालयाने फेटाळली होती:
जावेद अख्तर यांनी कंगना रणौतच्या विरोधात मानहानीचा खटला उच्च न्यायालयात दाखल केला होता. हा खटला रद्द करण्याची मागणी करणारी याचिका कंगनाने न्यायालयात दाखल केली होती. यावर 1 सप्टेंबरला सुनावणी झाली होती. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने आपला आदेश राखीव ठेवला होता. 9 सप्टेंबर रोजी न्यायालयाने कंगनाची ही याचिका फेटाळली होती.

काय म्हटलं होते कंगनाने?
कंगनाने तिच्या आरोपात म्हटले होते, की जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलावले होते. या भेटीत त्यांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला, की ऋतिक रोशन व त्याचे वडील ही मोठी माणसे असून जर तू त्यांची माफी मागितली नाही तर ती माणसं तुला सोडणार नाहीत. तुला तुरुंगात पाठवतील व त्यानंतर होणाऱ्या परिणामांना तुझ्याशिवाय आणखी कोणी जबाबदार नसेल. त्यानंतर कदाचित तुझ्याकडे कुठला पर्याय सुद्धा उरणार नाही व तुला आत्महत्या करावी लागेल, अशा शब्दात जावेद अख्तर यांनी मला धमकविण्याचा प्रयत्न केला होता. कंगनाची बहीण रंगोली चंदेलनेही तिच्या सोशल माध्यम अकाऊंटवर जावेद अख्तर यांच्या विरोधात अशाच प्रकारचे आरोप केले होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Judge warns Bollywood actress Kangana Ranaut to issue arrest warrant in defamation case of Javed Akhtar.

हॅशटॅग्स

#KanganaRanaut(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x