13 May 2021 2:55 AM
अँप डाउनलोड

नीट पहा! फासावर लटकलेली व्यक्ती जलद धावते आहे? अरे कोण हे कार्टून व्यंगचित्रकार?

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी स्वतःला बळकटी देण्यासाठी ‘प्रजासत्ताक’ फासावर लटकवल्याची बोचरी टीका राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून केली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

‘स्वतंत्रते न बघवते’, असे शीर्षक राज ठाकरे यांनी व्यंगचित्राला दिले आहे. पंतप्रधान मोदी ‘प्रजासत्ताक’ फासावर लटकवत आहेत आणि मोदींचे हात बळकट करा, असे म्हणत अमित शहा त्यांच्या भूमिकेला समर्थन देत असल्याचे व्यंगचित्रामध्ये दाखवण्यात आले आहे. मोदींच्यासीबीआय, आरबीआय, प्रसार माध्यम, न्यायालयं अशा एक ना अनेक स्वायत्त संस्थांच्या अधिकारांवर नियंत्रण आणले गेल्याचे अनेक वेळा पाहिले गेले आहे.

परंतु त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी भाजप समर्थकांकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका व्यंगचित्रात हास्यास्पद प्रकार घडला आहे. राज यांना प्रतिउत्तर देण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेलं व्यंगचित्र जसेच्या तसे कॉपी पेस्ट करण्यात आले आहे. परंतु फासावर लटकवलेली व्यक्ती ही राज ठाकरे यांच्यासारखी दिसणारी असली तरी, ती फासावर लटकलेली व्यक्ती जलद धावताना दिसत आहे. फासावर लटकलेली व्यक्ती धावताना दाखविणे म्हणजे अत्यंत हास्यास्पद म्हणावे लागेल. एकूणच काय तर ते कार्टून व्यंगचित्रकार स्वतःच मोठे कार्टून आहेत, असच अनेक व्यंगचित्रात दिसून आलं आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(664)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x