17 April 2021 2:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
कडक संचारबंदीत लोक शिवथाळी खायला जाणार कसे? | पण शिवथाळीसाठी गर्दी | राम कदम तोंडघशी Alert | हवेतून वेगाने पसरतो कोरोना, 3 देशांतील तज्ञांना याचा ठोस पुरावा सापडला - लँसेट जर्नल १९-२० एप्रिल नंतर रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होईल - डॉ. राजेंद्र शिंगणे Alert | एकूण रुग्णांपैकी 10% रुग्ण 11 ते 19 वयोगटातील तर 4.42% रुग्ण 10 वर्षांपेक्षा कमी वयाचे केंद्राची कोविड रणनीती, पहिला टप्पा लॉकडाउन, दुसरा टप्पा घंटी वाजवणे, तिसरा टप्पा देवाचे गुण गा प्रेतं जळत होती तेव्हा साहेब निवडणुकीत 'जुमलेबाजी' करत होते... इतिहास साक्ष देईल - काँग्रेस महाराष्ट्र एकीकरण समितीविरोधात प्रचार करून भाजप मराठी भाषिकांसोबत नाही हे सिद्ध झाले आहे
x

चपराक! लोकसभा निवडणुकांशी संबंध जोडून लेखिका गीता मेहतांनी 'पद्मश्री' नाकारला

भुनवेश्वर : सुप्रसिद्ध वरिष्ठ लेखिका गीता मेहता यांनी नुकताच घोषणा करण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार घेण्यास केंद्र सरकारला स्पष्ट नकार दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळे सदर मानाचा पुरस्कार स्विकारण्याची ही योग्य वेळ नसल्याचे कारण गीता मेहता यांनी पुढे केले आहे. विशेष म्हणजे गीता मेहता या ओडिशाचे विद्यमान मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या मोठ्या बहिण आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दरम्यान, त्यांनी या निर्णयाची घोषणा थेट पत्रकार परिषदेत केली आणि मोदी सरकारला तोंडघशी पडल्याची चर्चा रंगली आहे. सदर विषयाला अनुसरून पत्रकारांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, ‘भारत सरकारने मला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं, याचा मला खूप आनंद आहे. तसेच मला या पुरस्काराच्या पात्रतेचं मानलं. परंतु, मी हा पुरस्कार स्विकारू शकत नसल्याचे सुद्धा त्यांनी यावेळी नम्रपणे कळवले आहे. दरम्यान, भारतात लवकरच लोकसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. अशावेळी मी इतका मोठा पुरस्कार स्विकारल्यास जनमानसात चुकीचा संदेश जाईल, अशी शंका त्यांनी यावेळी संवाद साधताना व्यक्त केली. आणि तसे झाल्यास ते माझ्यासाठी तसेच केंद्र सरकारसाठी सुद्धा मानहानीकारक ठरेल आणि त्यासाठी मला नेहमीच दुःख होईल असं त्या म्हणाल्या.

गीता मेहता यांना शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल हा पुरस्कार बहाल करण्यात येणार आहे. सदर पुरस्कार हा भारतातील चौथ्या क्रमाकांचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मानला जातो.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1483)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x