4 May 2024 5:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

फोटोग्राफी तर माझा छंद आहे, तो मी सोडणार नाही: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

CM Uddhav Thackeray, Photography is my hobby

मुंबई:  शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा दुसरा भाग आज (मंगळवार) प्रसारित करण्यात आला. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर प्रकार टाकला आहे. शेतकरी कर्जमुक्ती, बुलेट ट्रेन, उद्योगधंदे, मराठवाड्यातील पाणीप्रश्न यावर त्यांनी भाष्य केले.

मुख्यमंत्री म्हणाले, ”सरकार एखाद्या प्रतिभावान व्यक्तिला ब्रॅंण्ड एम्बेसिडर नेमते, नंतर अशा लोकांना पुढे काय करायचे, ते काहीच माहिती नसते. तो तात्पुरता खुष होतो. परंतु, ते कशासाठी नेमले, याचा उद्देश पाहणे आवश्यक असते. त्यामुळे मी असे ठरविले आहे, की आता यापुढे अशा नियुक्त्या करण्यापेक्षा आपण स्वतः अशा स्थळांना भेटी द्यायच्या. पर्यटनस्थळे म्हणजे केवळ पर्यटकीय दृष्टीची स्थळे नाही, तर त्यामध्ये काही जंगले असतील. लेण्या असतील. धार्मिकस्थळे, तीर्थस्थळे असतील. तेथे मी स्वतः जाणार आहे. मी एकटाच नाही, तर माझ्यासोबत विविध क्षेत्रातील नामवंतांना बरोबर घेऊन जाणार आहे.”

ते पुढे म्हणाले, ”काही पर्यटक, कलाकार, संबधित अधिकारी यांचा ताफा बरोबर असेल. त्यामुळे त्या स्थळांचा टुरिस्ट मॅप तयार होऊन अशा पर्यटनस्थळांचा विकास करणे शक्य होईल. महाराष्ट्रातील अशी स्थळे जागतिक नकाशावर कसे नेता येईल, याचे नियोजन करण्यात येईल. तसेच तेथील चांगले फोटोही काढणार आहे. फोटोग्राफी तर माझा छंद आहे. तो मी सोडणार नाही. तो काही वाईट नाही. मी पर्यटनस्थळांना भेटी देताना कॅमेरा घेऊन जाणार आहे.”

मुंबई हे न झोपणारे शहर आहे. कष्टकऱ्यांसाठी साई उपलब्ध करून देणाऱ्यांसाठी नाईट लाईफचा उपयोग होऊ शकतो. पब, बार यासाठी फक्त नाईट लाईफ नाही, सर्वसामान्यांसाठी हे खूप गरजेचे आहे असं ते सरकारच्या नाईट लाईफच्या निर्णयावर मुलाखतीत म्हणाले.

 

Web Title:  CM Uddhav Thackeray says Photography is my hobby.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x