14 September 2024 8:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरची ब्रेकआऊट लेवल टेस्टिंग, तज्ज्ञांनी दिला फायद्याचा सल्ला - Marathi News EPF On Salary | पगारदारांसाठी खुशखबर! 50 हजाराच्या पगारावर EPF अकाउंटमध्ये 2.53 करोड रुपये जमा होणार - Marathi News HAL Vs BEL Share Price | HAL आणि BEL सहित या 5 डिफेन्स शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा NBCC Share Price | 229% मल्टिबॅगर परतावा देणारा NBCC शेअर खरेदी करा, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News Senior Citizen Saving Scheme | योग्य ठिकाणी पैसे गुंतवा आणि दरमहा कमवा 20,000; योजनेची पूर्ण डिटेल्स - Marathi News IREDA Share Price | PSU शेअर मालामाल करणार, स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट आली - Marathi News Smart Investment | लेकीसाठी गुंतवा फक्त रु.10,000; परतावा रक्कम मिळेल 55.61 लाख रुपये, आजच फॉर्म भरा - Marathi News
x

घाबरू नका! ४९ पैकी ४० रुग्ण परदेशातून आलेले, राज्यात मूळ संसर्गाचं प्रमाण कमी आहे

Health Minister rajesh tope, Corona Crisis

मुंबई, १९ मार्च:  कोरोना विषाणूशी लढण्यासाठी आपली यंत्रणा सज्ज आहे. हे युद्ध विषाणूविरोधात, सर्वांनी सहकार्य करावे: मुख्यमंत्री विषाणूविरोधात आहे. ते लढण्यासाठी तुम्ही सर्वांनी सहकार्य करावे. तुमच्या सर्वांचे सहकार्य हेच सरकारचे बळ आहे. आपल्याकडे जीवनावश्यक वस्तूंचा साठा आहे. त्यामुळे घाबरुन जाऊ नका, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. याचपार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करताना हे आवाहन केले.

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा देशात सर्वाधिक असला तरी, संसर्गाचं प्रमाण कमी आहे. राज्यात सध्या कोरोनाचे ४९ रुग्ण आहेत. मात्र यातले ४० रुग्ण परदेशातून राज्यात आले आहेत. या लोकांच्या संपर्कात आल्यानं कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या केवळ ९ इतकी आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी पत्रकार परिषदेत दिली. लोकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, असं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं.

एका २२ वर्षीय तरुणी तर एका ४९ वर्षीय महिलेला मुंबईमध्ये कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही ४९ वर पोहोचली आहे. अशात सुरक्षा म्हणून राज्यात सगळ्यात महत्त्वाच्या शहरांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना झालेल्या २२ वर्षीय तरुणीचा युरोप प्रवासाचा इतिहास आहे तर ४९ वर्षीय महिलेचा दुबई प्रवासाचा इतिहास आहे. या दोघींना तात्काळ उपचारासाठी नेण्यात आलं असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, काल मुंबईत एका ६८ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे ही महिला कोणताही परदेश दौरा करुन आली नव्हती.

गेल्या १२ तासांत राज्यात कोरोनाचे ७ रुग्ण आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर टोपेंनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या ४९ वर पोहोचल्याची माहिती त्यांनी दिली. कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या वाढली आहे. ४९ कोरोनाबाधितांपैकी ४० जण परदेशातून आलेले आहेत. त्यांना परदेशात असताना कोरोनाची बाधा झाली. ते इथे आल्यावर त्यांच्या माध्यमातून संसर्ग झालेल्यांची संख्या फक्त १० आहे, असं टोपे यांनी सांगितलं.

 

News English Summery:  Your mechanism is ready to fight the Corona virus. This war is against the virus, everyone should cooperate: CM is against the virus. You all should cooperate to fight it. The cooperation of all of you is the strength of the government. We have a stock of essential things. Therefore, do not be afraid, Chief Minister Uddhav Thackeray has appealed. There is an increase in the number of corona virus patients in Maharashtra. Against this backdrop, the Chief Minister made this appeal while addressing the people of Maharashtra. Although coronary population is highest in the state, the prevalence of infection is low. There are currently 49 Corona patients in the state. However, 40 of these patients have come from abroad to the state. The number of people who have been exposed to these people is only 9, ”Health Minister Rajesh Tope told a press conference. He again appealed that people should avoid unnecessary travel and should not rush to public places.

 

News English Title:  Story Corona virus crisis 40 out 49 patients came abroad says health minister Rajesh Tope News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x