आता महाविकास आघाडीचे सरकार सांगून पाडणार नाही | थेट कृती करणार - दरेकर
उस्मानाबाद, ५ डिसेंबर : कालच्या निकालानंतर तोंडघशी पडल्यानंतर देखील भारतीय जनता पक्षाचे नेते काही धडा घेताना दिसत नाही. महाविकास आघाडी सरकारची स्थापना होऊन एक वर्ष देखील पूर्ण झालं आहे. मात्र भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील नेत्यांना अजून सरकार कधी पडणार याचीच स्वप्नं पडत असून सामान्य लोकांच्या प्रश्नावर तुरळक आणि सरकार पडण्यावरच वारंवार भाष्य करताना दिसत आहेत.
भारतीय जनता पक्ष आता महाविकासआघाडीचे सरकार कधी पाडणार हे सांगणार नाही, आम्ही थेट कृती करु. परंतु, आम्ही राज्यात सरकार नक्की स्थापन करु, असे सूचक वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Vidhan Parishad Leader Pravin Darekar) यांनी केले. सरकार पाडण्यासंदर्भात बोलण्यापेक्षा आता कृतीवर लोकांचा जास्त विश्वास बसेल. त्यामुळे आम्ही सरकार पाडण्यासाठी आणखी किती महिने लागतील, हे सांगणार नाही, असे प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केले.
प्रविण दरेकर यांनी शनिवारी उस्मानाबादमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला. चांगल्या गोष्टी असेल तर बदल झाला पाहिजे. पराभवातून काही गोष्टी घेण्यासारख्या असतील तर त्या दुरुस्त केल्या पाहिजेत. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासंदर्भात आता आम्ही बोलण्यापेक्षा कृतीवर भर देऊ. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे इतर नेत्यांनी देखील सरकार बदलासंदर्भात बोलणे बंद केले तर ते चांगले ठरेल, असे देखील प्रविण दरेकर यांनी सांगितले.
एका जत्रेने देव म्हातारा होत नाही. तसेच अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्याची गरज नसते. अजून खूप निवडणुका बाकी आहेत. छोट्यामोठ्या चकमकी होत असतात, त्यामध्ये महाविकासआघाडी जिंकली आहे. परंतु, अजून मुख्य लढाई बाकी आहे. जनतेने हैदराबादमध्ये काय कौल दिला, हे सर्वांसमोर आहे. भारतीय जनता पक्षाच्या जागांमध्ये दसपटीने वाढ झाली आहे. परंतु, आम्ही विधानपरिषदेतील पराभवासंदर्भात जरुर आत्मचिंतन करु, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले.
News English Summary: The Bharatiya Janata Party will not say when it will overthrow the Mahavikasaghadi government, we will take direct action. However, we will definitely form a government in the state, said Pravin Darekar, Leader of Opposition in the Legislative Council. People will now have more faith in action than in talking about overthrowing the government. Therefore, we will not say how many more months it will take to overthrow the government, explained Pravin Darekar.
News English Title: MahaVikas Aghadi government will collapse soon said BJP Leader Pravin Darekar News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट