27 May 2022 4:48 AM
अँप डाउनलोड

लायन एअरवेजचं विमान समुद्रात कोसळलं, विमानात १८८ प्रवासी होते

जकार्ता : इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये आज सकाळी मोठी दुर्घटना घडली असून जकार्ताहून उड्डाण केलेले लायन एअरवेजचे प्रवासी विमान कोसळल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या अपघातग्रस्त प्रवासी विमानात एकूण १८८ प्रवासी होते अशी माहिती पुढे येत आहे. लायन एअरवेजचं जेटी ६१० हे प्रवासी विमान समुद्रात कोसळले असून उड्डाणाच्या अवघ्या १३ मिनिटांनंतर ही दुर्घटना घडली आहे.

अपघातग्रस्त झालेले प्रवासी विमान जकार्ताहून पान्गकल पिनांगच्या दिशेने प्रवास करत होते. दार दरम्यान, विमानानं उड्डाण केल्यानंतर सकाळी ६.३३ वाजण्याच्या सुमारास विमानाचा संपर्क तुटला. त्यानंतर हे प्रवासी विमान कोसळल्याचीच माहिती समोर आली आहे. इंडोनेशियन प्रशासनाकडून जोरदार शोध मोहीम सुरू करण्यात आली. परंतु, १८८ प्रवासी असलेल्या कुटुंबीयांमध्ये अत्यंत तणावाचं वातावरण आहे असं स्थानिक वृत्त वाहिन्यांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीमध्ये म्हटलं आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x