4 February 2023 10:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mirae Asset Mutual Fund | मिरे अ‍ॅसेटने नवीन फ्लेक्सी कॅप फंड लाँच केला, दीर्घ मुदतीत मोठा परतावा, योजनेची डिटेल्स Home Buying Tips | घर खरेदी करणार असाल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा नुकसान अटळ, आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Oppo Reno 8T 5G | ओप्पो रेनो 8T 5G स्मार्टफोन भारतात लाँच, 108 MP कॅमेरा, किंमत आणि फीचर्स पहा Adani Total Gas Share Price | अदानी गॅसचा शेअर गॅसवर, 5 दिवसात 51% खाली कोसळला, कंपनीचा गॅस संपण्याच्या मार्गावर? Bajaj Finance Share Price | चमत्कारी शेअर! या स्टॉकने 1 लाख रुपयांवर तब्बल 12 कोटी रुपये परतावा दिला, आजही आहे फेव्हरेट Post Office Scheme | या पोस्ट ऑफीस मासिक बचत योजनेचे व्याजदर वाढले, दरमहा 10650 व्याज मिळेल, स्कीम डिटेल Stocks To Buy | टॉप 10 शेअरची लिस्ट, अल्पावधीत देतील 60 टक्क्यांपर्यंत परतावा, कमाईची मोठी संधी
x

समोर पैलवानंच नाही म्हणणाऱ्या फडणवीसांना पावसात भिजणारे पवार पुन्हा आठवले

NCP President Sharad Pawar, CM Devendra Fadnavis

मुंबई: विधानसभेच्या निवडणुकीत सगळ्यात जास्त काय गाजलं असेल तर ते साताऱ्यातलं शरद पवारांचं पावसातलं भाषण. शरद पवारांच्या या पावसात भिजण्यावर आता मुख्यमंत्र्यांनी खोचक टीका केली आहे. निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी पावसात भिजावं लागतं यामध्ये आमचा अनुभव कमी पडला अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी पवारांवर निशाणा साधला आहे. ते मुबंईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी युतीच्या वादावरही मोठं वक्तव्य केलं आहे.

शरद पवार यांनी साताऱ्यात सभा घेतली आणि त्याचा परिणाम निवडूक निकाल आणि राज्यातल्या राजकारणावर दिसून आला. त्या एका भाषणाने भाकरी फिरवली. पर्यायाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागाही वाढल्या. कौल जरी महायुतीला मिळाला असला तरीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागाही वाढल्या. विरोधकांना चेहराच उरलेला नाही, समोर पैलवान दिसतच नाही या सगळ्या उत्तरांना शरद पवारांनी चोख प्रत्युत्तर दिलं. ज्याचा परिणाम मतदानावरही झाल्याचं पाहण्यास मिळालं.

विधानसभा निवडणुकीआधी अनेक आमदार भारतीय जनता पक्षात गेले असले तरीही राष्ट्रवादीनं चांगली लढत दिली. त्यावरुन अनेकांनी शरद पवारांच्या विजिगीषू वृत्तीचं कौतुक केलं. त्यावर भाष्य करताना मुख्यमंत्र्यांनी पवारांना टोला लगावला. ‘कोण त्यांना (पवारांना) मॅन ऑफ द मॅच म्हणतंय. कोण मॅन ऑफ द सीरिज म्हणतंय. पण सरकार कोणाचं स्थापन होतं हे महत्त्वाचं असतं,’ असं मुख्यमंत्री म्हणाले.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x