20 June 2021 9:36 PM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र पोलीस मेगा भरती; ३ सप्टेंबरपासून ऑनलाईन अर्ज; गावागावातून रेकॉर्डब्रेक अर्ज येण्याची शक्यता

mpsc, question papers, mpsc answer key 2019, mpsc prelims 2019, police bharti syllabus, police bharti, govexam, mega bharti, UPSC, Sarkari nokari, Sarkari naukri

मुंबई : महाराष्ट्रातील शहर आणि प्रत्येक गावामधून तरुण-तरुणी वाट पाहत महाराष्ट्र पोलीस दलातील मेगा भरतीची तारीख जाहीर झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी ही भरती होणार आहे. दरवर्षी या पोलीस भरतीसाठी प्रत्येक गावातील तरुण-तरुणी मोठ्या संख्येने हजेरी लावतात. सध्या शहरांपासून ते गावांपर्यंत खाजगी नोकऱ्यांची भीषण परिस्थिती असल्याने या भरतीसाठी सर्वचजण तुटून पडणार असल्यास बोललं जातं आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

विशेष म्हणजे या भरतीवेळी एक मोठा बदल करण्यात आला आहे आणि तो म्हणजे पहिल्यांदा मैदानी परीक्षेत पास होणे आवश्यक होते, मात्र नव्या नियमानुसार इच्छुक तरुण आणि तरुणींसाठी लेखी परीक्षा पहिल्यांदा पास व्हावी लागणार आहे. त्यामुळे खूप कमी वेळ असल्याने तरुणांना मोठी कसरत करावी लागणार आहे. दरम्यान, ग्रामीण भागात दुष्काळ आणि त्यानंतर ओला दुःष्काळ असं संकट ओढावल्याने आणि त्यात शेतीमध्ये नुकसान होत असल्याने गावातून मोठ्या संख्येने तरुण-तरुणी या पोलीस भरतीसाठी मैदानात प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं जातं आहे. दरवर्षी पेक्षा या वर्षी अधिक अर्ज येतील अशी परिस्थिती निर्माण झाली असून त्यात उच्च शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण देखील मोठं असेल अशी शंका व्यक्त करण्यात येते आहे.

याबाबत पोलीस विभागाने जिल्हावार जाहिरात प्रसिद्ध करण्याचे परिपत्रक अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके संजय सक्सेना यांनी आज काढले आहेत. उमेदवारांना पोलीस शिपाई भरतीसाठी ३ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत. हे अर्ज www.mahapariksha.gov.in या संकेतस्थळावर भरायचे आहेत.

पोलीस भरतीसाठी ३ सप्टेंबरमध्ये जिल्ह्यातील मुख्य वृत्तपत्रांमध्ये जाहीरात प्रसारीत करण्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे. राज्यातील बृहन्मुंबई, ठाणे शहर, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, नागपूर शहर, नवी मुंबई, औरंगाबाद शहर, सोलापूर शहर व लोहमार्ग मुंबई या ठिकाणच्या जागांची जाहीरात निणार आहे. तर ग्रामीणमध्ये रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, जळगांव, धुळे, नंदूरबार, कोल्हापूर, पुणे ग्रामीण, सातारा, सांगली, जालना, भंडारा आणि लोहमार्ग पुणे या ठिकाणच्या जागांसाठी जाहिरात प्रसारीत कराव्यात असे परिपत्रकात म्हटले आहे.

काय आहे त्या परिपत्रकात नेमकं?

हॅशटॅग्स

#MaharashtraPolice(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x