29 March 2024 3:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

कोणताही हप्ता नाही । गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना । कसा लाभ घ्याल? - नक्की वाचा

Gopinath Munde farmer accidental insurance

पुणे, ०३ जुलै | शेतात अपघात  किंवा मृत्यू आणि अपंगत्व या साठी शेतकर्‍यांना मदत म्हणून आपघात विमा योजना ही 2006 पासून सुरू आहे परंतु आता या योजनेचे नाव बदलून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठल्याही कंपनी मध्ये विमा भरण्याची गरज नाही , ही निशुल्क विमा योजना आहे. यासाठी शासन रक्कम भरते .ही योजना सन 2021-2022 मध्ये राबवण्यासाठी 8 मार्च 2021 रोजी शासन निर्णय घेऊन मंजूरी मिळाली आहे . ही योजना राबवण्यासाठी निधि रक्कम ही विमा कंपनीस एका वर्षासाठी सुपूर्द करण्यात आली आहे.

राज्यात शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात झाल्यास आता Insurance शासन मदतीसाठी धावले आहे. अपघातामुळे मृत्यू ओढवल्यास किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनातर्फे अर्थसहाय्य देण्यात येते.शेतकऱ्याला अपघात झाल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशावेळी अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबास Insurance योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य देण्यात येते.

शेतात काम करताना वेगवेगळय़ा कारणांनी जसे वीज पडून ,उंचावरून कोसळून इत्यादि कारणाने अपघातात मृत्यू आणि अपंगत्व आल्यानंतर आर्थिक साहाय्य देण्यासाठी Insurance गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली ज्यात शेतकऱ्यांच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांचा विमा Insurance मिळतो.

कोणत्या अपघात बाबीवर किती विमा वितरित केला जाईल ?
* जर शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला असेल तर या कारणास्तव त्याला २ लाख एवढा विमा त्याच्या कुटुंबाला दिला जाईल.
* जर शेतकऱ्याला दोन डोळे किंवा दोन अवयव गमवावे लागले, तर त्याला २ लाख एवढा विमा देण्यात येईल.
* जर शेतकऱ्याचा अपघातामध्ये एक डोळा व एक अवयव निकामी झाला असेल, तर त्या शेकऱ्याच्या कुटुंबाला २
* लाख एवढी रक्कम विम्याच्या स्वरूपात दिली जाईल.
* जर अपघातामध्ये शेतकऱ्याचा एक अवयव किंवा एक डोळा निकामी झाला असेल, तर त्याला १ लाख विमा दिला जाईल.

शेतकऱ्याला विमा लाभ केव्हा देय असेल:
योजना कालावधीत संपूर्ण दिवसासाठी म्हणजेच विहित कालावधीसाठी प्रत्येक दिवसाच्या २४ तासांसाठी हि योजना लागू असेल. या कालावधीत शेतकऱ्याला केव्हाही अपघात झाला किंवा अपंगत्व आले तरी ते या योजनेअंतर्गत लाभासाठी पात्र असेल.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी किंवा त्यांच्या वतीने अन्य कोणत्याही संस्थेने विमा कंपन्यांकडे स्वतंत्ररित्या विमा हप्त्याची रक्कम भरण्याची गरज नाही. तसेच यापूर्वी शेतकऱ्याने अथवा त्याच्या वतीने अन्य कोणत्याही संस्थेने कोणतीही वेगळी विमा योजना लागू केली असल्यास किंवा आधीच विमा उतरवला असल्यास त्याचा या योजनेशी काही संबंध असणार आंही .या योजनेअंतर्गत मिळणारे लाभ स्वतंत्र असतील. असे शासन निर्णयामध्ये नमूद केले गेले आहे.

शेतकरी लाभार्थी कधी या योजनेस पात्र असणार नाही ?
सदर योजनेस जर शेतकरी किंवा शेतकऱ्याचे कुटुंब लाभ घेण्यासाठी पात्र असेल. परंतु त्यांनी इतर शासनाच्या अपघातग्रस्त योजनेचा लाभ घेतला असेल. तर तो शेतकरी किंवा त्याचे कुटुंब गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात योजनेअंतर्गत कोणत्याही लाभास पात्र नसतील, याची नोंद घ्यावी.

विमा प्रस्ताव विहित कागदपत्रांसह योजनेअंतर्गत विमा संरक्षित कालावधीत कधीही प्राप्त झाला तरी तो विचारात घेणे तसेच योजनेच्या अखेरच्या दिवसात झालेल्या अपघातांसाठी योजनेचा चालू वर्षाचा मंजूर कालावधी संपल्यानंतर ९० दिवसांपर्यंत तालुका कृषी अधिकारी यांचेकडे प्राप्त झालेले प्रस्ताव स्वीकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहील.

या शिवाय योजनेचा चालू वर्षाचा मंजूर कालावधी संपल्यानंतर ९० दिवसांपर्यंत संगणक प्रणाली मध्ये नोंद झालेल्या पुर्व सुचना अर्जान्वये तालुका कृषी अधिकारी यांच्या कडे प्राप्त होणारे विमा प्रस्तावसुद्धा विमा पॉलिसीचा कालावधी संपल्याच्या दिवसापासून ३६५ दिवसांपर्यंत स्विकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहील. मात्र सदर कालावधी नंतर कोणताही प्रस्ताव स्विकारला जाणार नाही. तसेच या संदर्भात ग्राहक मंच किंवा इतर निर्णय किंवाआदेश शासनावर बंधनकारक राहणार नाहीत.

योजनेचा लाभ घेण्यासाठी घेण्यासाठी पात्रता कोणती?
महाराष्ट्र तील १० ते ७५ वयोगटातील महसूल नोंदी नुसार विमा पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील वहितिधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक सदस्य त्यामध्ये आई,वडिल, लाभार्थी चे पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती असे १० ते ७५ वर्षे वयोगटातील एकुण दोन जणांना लाभ घेता येईल.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करावा ?
या योजनेसाठी अर्ज करावयाचा असल्यास तालुका कृषी अधिकाऱ्याशी संपर्क करावा. शेतकऱ्याला दि युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि जायका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा. लि. या विमा कंपन्यांकडून शेतकऱ्याला विम्याची रक्कम देण्यात येईल.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंमलबजावणी शासन निर्णय २७ एप्रिल २०२१:
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत विहितधारक खातेदार शेतकरी व यांच्या कुटुंबियांचा समावेश करण्याबाबत शासन निर्णय ३१ ऑगस्ट २०२० घेण्यात आला होता. सदर योजनेअंतर्गत लाभास पात्र असणाऱ्या शेतकऱ्याने किंवा शेतकऱ्याच्या कुटुंबातील सदस्यांनी अथवा वारसदाराने शासनाच्या अन्य विभागांकडून अपघातग्रस्तासाठी असलेल्या योजनेचा लाभ घेतला असल्यास, सदर लाभार्थी या योजनेअंतर्गत लाभार्थीस लाभास पात्र ठरणार नाही. असा निर्णय २७ एप्रिल २०२१ रोजी च्या बैठकीत घेण्यात आला.

विमा हप्ता किती भरायचा?
शेतकऱ्याला विमा हप्ता भरण्याची गरज नाही. कारण सरकार शेतकऱ्याच्या वतीने विमा कंपनीस प्रति शेतकरी रु. ३२.२३ रुपये विमा कंपनीस भरते.

अर्ज करण्यास लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती ?
* अ. दावा दाखल करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे असतील
* i ) पूर्वसूचनेचे अर्ज कागदपत्रे:
* ७/१२ आणि ८-अ प्रमाणपत्र यांची मूळ प्रत
* मृत्यूचे प्रमाणपत्र
* अपघात कोणत्या कारणामुळे झाला याचा प्रथम माहिती अहवाल किंवा पोलीस पाटील अहवाल.
* वयाचा दाखला ( उपलब्ध नसल्यास शपथपत्र)
* घटना स्थळ पंचनामा

लाभ मिळवण्यासाठी सदरचा दावा अपघातानंतर ४५ दिवसांच्या आत नोंदवण्यात यावा. म्हणजे शेतकऱ्याला किंवा त्याच्या कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येईल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Gopinath Munde farmer accidental insurance online application news updates.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x