26 July 2021 3:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली; ‘या’ दोन बड्या नेत्यांची मुलाखतीला दांडी

NCP MLA Baban Shinde, MLA Dilip Sopal, NCP, Sharad Pawar, Ajit Pawar, Maharashtra Assembly Election 2019

सोलापूर : जसजशा विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत तस तशी सत्ताधाऱ्यांच्या पक्षात जाणाऱ्यांची संख्या देखील वाढताना दिसत आहेत. दलबदलीचा सर्वाधिक मोठा फटका हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला बसत आहे. मात्र त्याचे लोन आता पक्षाचे बालेकिल्ले असलेल्या मतदारसंघात देखील पसरू लागल्याचे दिसत आहे. तसाच काहीसा प्रकार सोलापूरमध्ये राष्ट्रवादीच्या बाततीत घडणार असल्याची जोरदार राजकीय चर्चा रंगली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचे सत्र सुरु केले आहे. आज सोलापूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु आहेत. मात्र या मुलाखतीसाठी माढा मतदारसंघाचे आ. बबन शिंदे आणि बार्शीचे आ. दिलीप सोपल हे अनुउपस्थित आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं चर्चेने जोर पकडला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक कॉंग्रेस – एनसीपी’च्या नेत्यांनी भारतीय जनता पक्ष आणि सेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे बबन शिंदे आणि दिलीप सोपल हे देखील पक्षांतर करणार असल्याची चर्चा आहे. गेले काही दिवस या दोन्ही नेत्यांनी युतीच्या नेत्यांशी चांगलीचं जवळीकता वाढवली आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते भारतीय जनता पक्ष-शिवसेनेत आपले बस्तान बसवणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान आषाढी एकादशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात राजकीय वारी केली होती. या वारीत आ. बबन शिंदे यांच्या घरी देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी खिचडी खाली. त्यामुळे बबन शिंदे यांची खिचडी ही पक्षांतारच्या चर्चेला पोषक ठरली.

तत्पूर्वी ठाण्यातील एनसीपीचे नेते आणि शहापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बरोरा यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला होता. त्यानंतर बरोरो हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेत दाखल झाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी एनसीपीला अजून किती धक्के बसणार ते पाहावं लागणार आहे.

हॅशटॅग्स

#NCP(361)#Sharad Pawar(398)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x