15 May 2021 11:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
आपला शत्रू एक बहुरूपी आहे, तो कपडे बदलून फोटो काढत असतो - सुरेंद्र राजपूत ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या १० दिवसांनी नाशिकमध्ये प्रकटलेले, पण चंद्रकांतदादा म्हणाले फडणवीस आणि मी.... कोणत्या फेक न्यूज फॉलो करते ही? | म्हणाली, समजलं की ते गंगा नदीतील नाही तर नाजयेरियातील फोटो राजकीय विरोधकांचा 'छळ' ही एकमेव 'टूलकिट' मोदी, शहा आणि आदित्यनाथ वापरतात - काँग्रेस राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस
x

चंद्रकांतदादांना खरंच राजकीय ज्ञान आहे? | युवा वॉरियर्सला खोटी माहिती देत राजकीय करियर मार्गदर्शन

Chandrakant Patil, Narendra Modi, Dr AJP Abdul Kalam

पुणे, २० फेब्रुवारी: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरून विधानसभा मतदारासंघाचे आमदार चंद्रकांत पाटील पुन्हा एका नव्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. नरेंद्र मोदी यांनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं, असं अजब विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने तरुणाईला जोडण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या युवा वॉरियर्स अभियानाचा शुभारंभ चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुण्यात झाला. त्यावेळी ते बोलत होते. याचवेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनीच अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं, असं वक्तव्य त्यांनी केलं.

यावेळी आमदार भीमराव तापकीर, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. “नरेंद्र मोदी यांनी सर्व मुसलमानांना स्थान दिले असून, अब्दुल कलाम यांना देखील राष्ट्रपती त्यांनी केल आहे. त्यांना राष्ट्रपती मुस्लिम म्हणून केल नव्हते, तर एक कर्तृत्ववान, संशोधक म्हणून त्यांना केलं होतं,” असं पाटील यांनी म्हटलं आहे. पाटील यांच्या भाषणाचा व्हिडीओही फिरत असून, त्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.

वस्तुस्थिती काय?
एपीजे अब्दुल कलाम हे २००२ ते २००७ या काळात राष्ट्रपती पदावर होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं कलाम यांचं नाव राष्ट्रपतीपदासाठी सुचवलं होतं. काँग्रेस व समाजवादी पक्षानंही त्यांच्या नावाला पाठिंबा दिला होता. नरेंद्र मोदी हे त्या काळात गुजरातमध्ये मुख्यमंत्री होते. कलाम यांच्या राष्ट्रपतीपदाशी त्यांचा संबंध नव्हता. असं असतानाही पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळं उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

 

News English Summary: BJP state president and MLA of Kothrun assembly constituency Chandrakant Patil has come into the spotlight again due to a new statement. Chandrakant Patil has made a strange statement that Narendra Modi made Abdul Kalam the President.

News English Title: Chandrakant Patil has made a strange statement that Narendra Modi made Dr AJP Abdul Kalam the President news updates.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(105)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x