23 April 2024 6:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल
x

चंद्रकांत पाटील म्हणजे मोदी लाटेत लॉटरी लागलेला माणूस - अजित पवार

Pandharpur Magalvedha

पंढरपूर, १५ एप्रिल: राज्यात एकीकडे कोरोनाची स्थिती गंभीर होत चालली असताना दुसरीकडे मात्र पंढरपूर मंगळवेढा निवडणूकीचा धुरळा उडाला आहे. १७ एप्रिलला पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक पार पडणार असून राष्ट्रवादी आणि भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या नेत्यांना ग्रामीण भागाशी काहीही देणघेणं नाही. चंद्रकांत पाटील हा मोदी लाटेत लॉटरी लागलेला माणूस आहे. त्यांना कोणतीही संस्था किंवा साधी सोसायटी चालवण्याचाही अनुभव नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली.

ते बुधवारी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या शिवाजी चौकातील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. चंद्रकांत पाटील यांनी कधी कुठलीही संस्था काढलेली नाही, कुठलीही बँक किंवा कारखाना चालवलेला नाही, कुठलीही विकास सोसायटी किंवा मजूर सोसायटी चालवलेली नाही. टरबूज-खरबुज सोसायटी कधी काढली नाही. त्यांना ग्रामीण भागाच्या प्रश्नांशी काहीही देणघेणं नाही. नरेंद्र मोदी साहेबांच्या नावाचा झंझावात आल्यामुळे त्यांना लॉटरी लागलेली आहे. ही गोष्ट पंढरपूरच्या मतदारांनी समजून घ्यावी. शेतकरी आणि गोरगरीबांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी भगीरथ भालके यांना प्रचंड मताधिकाऱ्याने विधानसभेवर निवडून पाठवा, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

अजित पवारांनी बोलायला सुरुवात करतानाच म्हटले की, राजकारणात कोणी कायमचा मित्र किंवा शत्रू नससो. आणि राज्यातील आघाडी सरकार पाडणे म्हणजे काय खेळ वाटतो काय? हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिले. काल सायंकाळी पंढरपूर येथील शिवाजी चौकात राष्ट्रवादी उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचाराची सभा घेण्यात आली यावेळी ते बोलत होते.

 

News English Summary: Chandrakant Patil and BJP leaders have nothing to do with rural areas. Chandrakant Patil is a lottery winner in the Modi wave. He has no experience of running any organisation or simple society, said Deputy Chief Minister and NCP leader Ajit Pawar.

News English Title: Deputy CM Ajit Pawar slams Chandrakant Patil during Pandharpur Magalvedha by poll campaign news updates.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x