14 December 2024 10:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

कर्नाटक निवडणुकीनंतर दक्षिण भारत भाजप मुक्तीच्या दिशेने असताना मध्य प्रदेशात देखील राजकीय भूकंप होणार, मोठे नेते काँग्रेसच्या संपर्कात

Madhya Pradesh Assembly Election 2023

Madhya Pradesh Assembly Election 2023 | सध्या महत्वाच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मोदींनी जोर लावून प्रचार केला तरी भाजपची सत्ता जाण्याचे संकेत मिळत आहेत. त्यानंतर संपूर्ण दक्षिण भारत हा भाजप मुक्त होईल असं राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत. मात्र कर्नाटक निवडणुकीनंतर हिंदी पट्ट्यातील मध्य प्रदेश आणि राजस्थान या भाजपाची सत्ता असलेल्या दोन महत्व पूर्ण राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत.

मात्र त्यातील मध्य प्रदेश देखील भाजपची सत्ता जाणार असा स्थानिक वाहिन्यांनी अंदाज व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेशातील भाजपच्या नेत्यांना देखील त्याची चुणूक लागल्याचं म्हटलं जातंय आणि त्यामुळे अनेक मोठे नेते काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं म्हटलं जातंय. त्यासाठी अनेकजण मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमलनाथ यांची भेट घेत असल्याचं वृत्त आहे.

भाजपाची भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कैलास जोशी यांचे चिरंजीव दीपक जोशी विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षबदल करणार आहेत. ते शनिवारी माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. देवास जिल्ह्यातील बागली आणि हातपिपल्याचे माजी आमदार जोशी हे बऱ्याच काळापासून प्रदेश भाजप संघटनेवर नाराज होते आणि त्यांनी १ मे रोजी जाहीरपणे नाराजी व्यक्त करत काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिले होते.

यानंतर त्यांची समजूत काढण्यासाठी राज्य भाजप संघटनेकडून प्रयत्न करण्यात आले, मात्र ते काँग्रेसमध्ये जाण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसून येत आहे. आज त्यांच्या पत्नीची पुण्यतिथी असून उद्या कमलनाथ यांची भेट घेऊन ते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. जोशी 2018 मध्ये शिवराज सिंह चौहान सरकारमध्ये पहिले तंत्रशिक्षण मंत्री होते. प्रदेश काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक जोशी यांचा पक्ष प्रवेश निश्चित झाला आहे. त्यांनी कमलनाथ यांची भेट घेतली असून शनिवारी ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

दरम्यान, जोशी यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो बंद असल्याचे निदर्शनास आले. मात्र, काल सायंकाळी उशिरा त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या निर्णयाचा पुनरुच्चार केला. जोशी हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री दिवंगत कैलाश जोशी यांचे पुत्र आहेत, अशी माहिती प्रदेश भाजपच्या सूत्रांनी दिली.

दरम्यान, दीपक जोशी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर देवास जिल्ह्यातील हातपिपल्य विधानसभा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवू शकतात, असे मानले जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस भाजपवर धोरणात्मक हल्ला म्हणूनही त्यांचा वापर करेल, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. दीपक जोशी यांचे वडील आणि जनसंघाचे संस्थापक कैलास जोशी हे या राज्याचे मुख्यमंत्री राहिले असून त्यांची प्रतिमा अत्यंत स्वच्छ आणि प्रामाणिक व्यक्ती अशी आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Madhya Pradesh Assembly Election 2023 BJP Leaders leaving party check details on 05 May 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x