26 January 2022 10:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | काल 1 दिवसात या 10 पेनी शेअर्समधून तब्बल 10 टक्क्यांपर्यंत कमाई | यादी सेव्ह करा PPF Investment | या सरकारी योजनेत दररोज इतके पैसे जमा करून कोटीचा निधी जमा होईल | जाणून घ्या माहिती Cryptocurrency Investment | क्रिप्टोकरन्सीत गुंतवणुकीपूर्वी या गोष्टी नक्की तपासा | गुंतवणूक सुरक्षित आणि नफ्यात राहील Stock To BUY | मोठ्या नफ्यासाठी मल्टिबॅगर स्टॉक निओजेन केमिकल्स खरेदी करा | HDFC सिक्युरिटीजचा सल्ला Daily Rashi Bhavishya | 26 जानेवारी 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल 2022 Honda CBR650R | होंडा CBR650R 2022 भारतात लॉन्च | बुकिंग शुरू | वैशिष्ट्ये जाणून घ्या Gold Silver Prices Today | आज पुन्हा सोनं महागलं, पण चांदीचे दर घसरले | जाणून घ्या ताजी किंमत
x

Health First | चांगली झोप येण्यासाठी दुधात तूप मिसळून प्या

Ghee with Milk

मुंबई, १२ जून | निरोगी राहण्यासाठी चांगली झोप घेणे खूप महत्वाचे आहे. म्हणूनच बर्‍याच लोकांना रात्री 11 पर्यंत झोपणे आणि सकाळी वेळीच उठणे आवडते. या मुळे दिवसभर ताजेपणा राहतो आणि मेंदू देखील हलकं राहतो. कधी -कधी तणावामुळे जास्त थकवा आल्यामुळे निद्रानाशाची समस्या सुरु होते. या मुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. कोणत्याही कामात मन लागत नाही, आळशीपणा जाणवणे,डोकेदुखी,दिवसभर झोप न येणं. या सारख्या समस्या उद्भवू लागतात. या पासून मुक्तता साठी दररोज दुधात तूप घालून प्यावे.चला तर मग याचे फायदे जाणून घ्या.

निद्रानाश ची समस्या:
निद्रानाशाची समस्या असल्यास दररोज दुधात तूप घालून प्यावे. असं केल्याने मेंदूच्या नसा शांत होतात आणि शांत झोप लागते.

चमकणारी त्वचा:
दुधात आणि तुपात नैसर्गिक मॉइश्चरायझर असते. याचे सेवन केल्याने चेहऱ्यावर चकाकी येते. हे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यात मदत करते.

सांधेदुखी पासून आराम:
आजच्या काळात सांधेदुखी होणं देखील खूप सामान्य झाले आहे. या वर अद्याप काहीही प्रभावी उपाय सापडला नाही. इतर औषधांसह दूध तुपाचे सेवन करू शकता. तुपामधील आढळणारे के 2 दुधातील कॅल्शियम सामग्री शोषण्यात मदत करते. या मुळे सांधे दुखण्यात आराम मिळेल.

 

News Title: Ghee with Milk is beneficial for health news updates.

हॅशटॅग्स

#Health(770)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x