27 June 2022 2:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Poco F4 5G | पोको F4 5G स्मार्टफोन सेल | 4000 रुपयांची सूट आणि फ्री हॉटस्टार, डिस्ने आणि यूट्यूब प्रीमियम New Labour Code | कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 4 दिवस काम, 3 दिवस विश्रांती | 1 जुलैपासून नियमांची अंमलबजावणी होणार? Maharashtra Political Crisis | महाविकास आघाडी सरकार अल्पमतात | सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष Maharashtra Political Crisis | सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यास भाजपाचा पॉलिटिकल प्लॅन तयार Zomato Share Price | झोमॅटोच्या शेअरमध्ये गुंतवणूक करा | 100 टक्के मल्टिबॅगर रिटर्न कमाई होईल नवाब मलिक मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी नव्हते | संजय दत्त होता | भाजपच्या स्क्रिप्टवर शिंदेंच्या जनतेला टोप्या Aadhaar Card | तुमच्या आधार कार्डशी संबंधित हे काम 3 दिवसांत करा | अन्यथा मोठे नुकसान होईल
x

भारत-पाकिस्तान शत्रुत्त्वामुळे अनेक लोकांना आपले जीव गमवावे लागतील: डोनाल्ड ट्रम्प

India, Pakistan, Pakistan Zindabad, Pulawama Attack, Donald Trump

वॉशिंग्टन : पुलवामा जिल्ह्यातील भ्याड हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील परिस्थिती चिघळताना दिसत आहे. जागतिक बलाढ्य देश असलेल्या अमेरिकेतून देखील सतर्कतेचे इशारे दिले जात आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती अतिशय भयानक आहे, असे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. तसेच भारत आता मोठ्या कारवाईच्या तयारीत आहे, असे ट्विटदेखील त्यांनी केले आहे. त्यांनी पाकिस्तानला सज्जड दम दिला असून १३० कोटी रुपयांची मदत रोखली आहे. पाकिस्तानने अमेरिकेचा विश्वासघात केला असेही ते म्हणाले. दरम्यान, पाकिस्तान आर्थिक अडचणीत असताना ट्रम्प यांनी उचलेलं हे पाऊल म्हणजे भारतासाठी एक प्रकारे मदत समजली जात आहे.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘भारत आणि पाकिस्तानात फार वाईट परिस्थती असून आम्हाला हे शत्रुत्त्व थांबावयाचे आहे. या शत्रुत्त्वामुळे अनेक लोकांना आपले जीव गमवायला लागले, त्यामुळे हे थांबवणे गरजेचे आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारत आता मोठी भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. कारण भारताचे जवळपास ५० जवान या हल्ल्यात मारले गेले. त्यामुळे या देशाची भूमिका समजण्यासारखी आहे. परंतु आम्ही दोन्ही देशांशी बातचीत करत असून ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

हॅशटॅग्स

#Donald Trump(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x