23 May 2022 10:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stock | अदानी ग्रुपच्या या शेअरने 1 लाखाच्या गुंतवणुकीचे 1 कोटी केले | स्टॉकबद्दल जाणून घ्या Stocks To Buy | या 5 शेअर्समधून मिळेल मजबूत नफा | 60 टक्क्यांपर्यंत बंपर रिटर्न्स कमाईची संधी Swing Trading Stocks | या आठवड्यातील स्विंग ट्रेडिंगसाठी टॉप शेअर्स हे आहेत | नफ्याच्या शेअर्सची यादी Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा Stocks To Buy Today | या 5 शेअर्समधून 1 आठवड्यात कमाईची मोठी संधी | ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला Investment Planning | मुलांच्या चांगल्या आर्थिक भविष्यासाठी हे आहेत तुमच्या फायद्याचे पर्याय Hot Stocks | या शेअरमधून येत्या 3-4 आठवड्यांत 20 टक्के कमाईची संधी | स्टॉकबद्दल जाणून घ्या
x

बाळासाहेब ठाकरे मर्द होते तर उद्धव ठाकरे घुटने टेकू: अबू आझमी

Abu Asim Azami, Samajwadi Party, Shivsena, Udhav Thackeray

मुंबई : स्वबळाची शपथ घेणारे आणि मागील साडेचार वर्ष सत्तेत राहून भाजप आणि मोदींवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच युतीची घोषणा केली आहे. त्यानंतर सर्वच विरोधकांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आसीम आझमी यांनी आता उद्धव ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेची खिल्ली उडवली आहे. एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. अबू आसीम आझमी म्हणाले, ‘बाळासाहेब ठाकरे मर्द होते तर उद्धव ठाकरे घुटने टेकू आहेत’ अशी बोचरी टीका केली आहे. भाजपवर टीका करून आणि भाजपच्या अल्टिमेटमला घाबरून उद्धव ठाकरे यांनी भूमिका बदलली असं अबू आझमी म्हणाले.

त्यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर सर्वच विरोधक उद्धव ठाकरेंच्या या धरसोड वृत्तीवर टीका करतील. तसेच स्वबळाची शपथ स्वतःच मोडल्याने पक्षांतर्गत अनेक कुरबुरी समोर येण्यास सुरुवात झाली आहे. सर्वात मोठी कोंडी झाली आहे ती शिवसेना कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची जे स्वबळाची घोषणेमुळे निवडणुकीच्या तयारीला लागले होते.

हॅशटॅग्स

#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x