15 December 2024 9:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Toll Plaza Distance | 60 किलोमीटरमध्ये एकच टोल प्लाझा असेल | स्थानिक लोकांना पास मिळणार

Toll Plaza Distance

मुंबई, 22 मार्च | महामार्गावरचा प्रवास आगामी काळात स्वस्त होणार आहे, कारण सरकारला याची काळजी वाटत असून त्यादृष्टीने आराखडाही तयार करण्यात आला आहे. सरकार ठराविक मर्यादेत एकदाच टोल वसूल करेल. टोल प्लाझाजवळ राहणाऱ्या आणि महामार्गावरून सतत प्रवास करणाऱ्या स्थानिकांना दिलासा देण्यासाठी (Toll Plaza Distance) त्यांना पास देण्याची योजना आहे.

To give relief to the local people living near the toll plaza and constantly traveling on the highway, there is a plan to give them passes :

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी लोकसभेत सरकारच्या या योजनेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आता महामार्गावरील टोलनाक्यांची संख्या मर्यादित असेल, तर स्थानिकांना आता टोल भरावा लागणार नाही. सरकारची ही योजना येत्या ३ महिन्यांत लागू होणार आहे.

अनेक टोलनाके बंद होतील :
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली की सरकार येत्या 3 महिन्यांत देशातील टोलनाक्‍यांची संख्या कमी करणार आहे आणि 60 किलोमीटरच्या परिघात फक्त एकच टोल प्लाझा कार्यरत असेल. नितीन गडकरी म्हणाले की, ६० किमीच्या परिघात येणारे इतर टोलनाके येत्या ३ महिन्यांत बंद केले जातील.

स्थानिक लोकांना पास देणार :
केंद्रीय मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, टोल प्लाझाजवळ राहणाऱ्यांना टोल भरावा लागणार नाही, त्यांना पास दिला जाईल. यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला दिलासा तर मिळेलच, पण अधिकाधिक लोक टोल भरून महामार्गावरून प्रवास करण्यास प्रवृत्त होतील.

वास्तविक, महामार्गावरील वाहतूक वाढवून टोलचे उत्पन्न वाढवण्यावर सरकारचा भर आहे. त्याचबरोबर टोलनाक्यांजवळ राहणाऱ्यांची नेहमीच मागणी असते की, त्यांना टोलमध्ये सवलत द्यावी, कारण स्थानिक असल्याने त्यांना सतत प्रवास करावा लागतो.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Toll Plaza Distance in 60 kilometer local peoples will get pass 22 March 2022.

हॅशटॅग्स

#NitinGadkari(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x