15 May 2021 4:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या १० दिवसांनी नाशिकमध्ये प्रकटलेले, पण चंद्रकांतदादा म्हणाले फडणवीस आणि मी.... कोणत्या फेक न्यूज फॉलो करते ही? | म्हणाली, समजलं की ते गंगा नदीतील नाही तर नाजयेरियातील फोटो राजकीय विरोधकांचा 'छळ' ही एकमेव 'टूलकिट' मोदी, शहा आणि आदित्यनाथ वापरतात - काँग्रेस राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस महाराष्ट्र सरकारची लस खरेदी निविदा मोदी सरकारने परवानगी न दिल्याने रखडली
x

अमेझॉनचा बाजार ऑफलाईन फोडला | ऑनलाईन माज उतरला | अ‍ॅपवर लवकरच मराठी भाषा

MNS party, Akhil Chitre, Amazon Apologies, Raj Thackeray

मुंबई, २६ डिसेंबर: मनसेने केलेल्या खळ्ळखट्याक आंदोलनानंतर अॅमेझॉन बॅकफूटवर गेल्याचं दिसत आहे. कारण आज अॅमझॉनच्या अधिकाऱ्यांनी विविध प्लॅटफॉर्मवर लवकरच मराठी भाषेचा वापर करणार असल्याचं आश्वासन दिल्याचा दावा मनसे नेते अखिल चित्रे यांनी केला आहे. आज मनसे नेते आणि अॅमेझॉनच्या अधिकाऱ्यांमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा झाली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

अ‍ॅमेझॉनने आपल्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेचा समावेश करण्याचं आश्वासन दिलं असल्याची माहिती मनसे नेते अखिल चित्रे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. यासोबतच अ‍ॅमेझॉनकडून राज ठाकरेंची दिलगिरी व्यक्त केल्याचा दावाही अखिल चित्रे यांनी केला आहे.

“ज्याप्रकारे त्यांनी आपल्या वेब पेजवर किंवा मोबाइल अ‍ॅपवर भाषा निवडताना मराठी लवकरच आणत आहोत आणि आपण क्षमस्व आहोत असं त्यांनी टाकलं आहे. मराठीद्वेष दाखवला तेव्हाच आम्ही मनसैनिक अ‍ॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार असं सांगितलं होतं. त्याचप्रकारे शुक्रवारी काही फटाके फुटले आणि अ‍ॅमेझॉन प्रशासन खडबडून जागं झालं,” असं अखिल चित्रे यांनी सांगितलं.

 

News English Summary: It seems that Amazon has gone on the backfoot after the tumultuous agitation by MNS. MNS leader Akhil Chitre has claimed that Amazon officials have promised to use Marathi language on various platforms soon. Today there has been a discussion between MNS leaders and Amazon officials through video conferencing.

News English Title: MNS party Leader Akhil Chitre Says Amazon Apologies to Raj Thackeray news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(158)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x