14 August 2022 11:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Xiaomi CyberOne Robot | शाओमीने तयार केला स्मार्ट रोबोट, काम करताना मनुष्याच्या भावनेनुसार विचार करू शकणार Multibagger Mutual Funds | या 3 जबरदस्त मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना लक्षात ठेवा, SIP ने 3 वर्षात लाखोंचा फायदा Horoscope Today | 15 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 2023 Kia Ray | 2023 किआ रे कार लाँच, जबरदस्त लूकसह मिळणार शानदार असे फीचर्स Viral Video | तो बाईक सहित खड्ड्यात पडला की खड्ड्यातून वर आला?, विचित्र अपघाताचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय अमित शहांनी फडणवीसांना उपमुख्यमंत्री बनवलं | तर फडणवीसांनी मुनगंटीवार आणि चंद्रकांतदादांचं राजकीय वजन घटवलं शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचं खातेवाटप | दादा भुसेंकडून कृषी खातं सत्तारांकडे, शिंदेंकडून मूळ शिवसैनिकांना हलकी खाती
x

'करेक्ट कार्यक्रम' हा शब्द देखील चोरल्यासारखा वाटतो - जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad, Devendra Fadnavis

मुंबई, १३ एप्रिल: राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. करेक्ट कार्यक्रम हा शब्द प्रयोगावरुन सध्या राजकारणात ज्या घडामोडी घडत आहेत त्यावरुन विरोधी पक्ष आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. यावरुनच राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावले आहे.

देवेंद्र फडणवीसांनी करेक्ट कार्यक्रम हा शब्द वापरला. हा शब्दही चोरल्यासारखा वाटतो. हा शब्द नेमका कुणाचा आहे हे सर्वांना माहीत आहे, असं टोला जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीसांना लगावला. यावेळी त्यांनी करेक्ट कार्यक्रम या शब्दावरून देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. पंढरपूरच्या सभेत विरोधी पक्षनेत्यांनी करेक्ट कार्यक्रम करतो हा शब्द वापरला. पण हा शब्दही चोरल्यासारखा वाटतो. तो कुणाचा आहे हे सर्वांना माहीत आहेच, असं ते म्हणाले. तसेच, भाजप नेहमीच मतांचं ध्रुवीकरण करत आला आहे. हे सर्वांनाच माहीत आहे, असंही ते म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते जयंत पाटील;
पवारसाहेब तुम्ही पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीची काळजी करु नका. तुम्ही प्रकृतीची काळजी घ्या, इकडचा कार्यक्रम आमचं आम्ही करतो”, या शब्दात राष्ट्रवादीचे प्रवक्ते जयंत पाटील यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने भगीरथ भालके यांना पोटनिवडणुकीसाठी मैदानात उतरवलं आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जयंत पाटील पंढरपुरात होते. त्यावेळी त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला

 

News English Summary: State Housing Minister Jitendra Awhad has slammed Leader of Opposition Devendra Fadnavis. The term ‘correct program’ is being used to describe the current developments in politics, which have led to allegations being leveled at the Opposition and the Mahavikas Alliance government. NCP leader and Housing Minister Jitendra Awhad has told Devendra Fadnavis about this.

News English Title: State Housing Minister Jitendra Awhad has slammed Leader of Opposition Devendra Fadnavis news updates.

हॅशटॅग्स

#Jitendra Awhad(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x