27 July 2024 10:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
x

कणकवलीत राणेंच निर्विवाद वर्चस्व, भाजप-सेना आघाडीला धोबीपछाड

कणकवली : राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजप-सेना आघाडीला धोबीपछाड देत नगराध्यक्षपदासह एकूण १७ पैकी ११ जागांवर विजय मिळत कणकवली नगरपंचायतीवर निर्विवाद बहुमत मिळवले आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने एकूण ११ जागांवर विजय मिळवला आहे.

कणकवलीत राणे फॅक्टर समोर भाजप – शिवसेना आघाडी टिकाव धरू शकली नाही आणि अखेर कणकवली नागरपरिषदेवर नारायण राणे यांचेच निर्विवाद वर्चस्व असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांनी भाजपचे उमेदवार संदेश पारकर यांचा पराभव केला, परंतु संदेश पारकर यांनी सुद्धा कडवी झुंज दिली. नारायण राणेंना पराभूत करण्यासाठीच शिवसेनेने येथे भाजपशी युती केली होती परंतु त्याचा काहीच परिणाम झाला नसल्याचे चित्र आहे.

एकूण १७ जागां पैकी स्वाभिमान पक्षाला एकूण ११ जागा, भाजप ३, शिवसेना ३ आणि राष्ट्रवादी १ असा निकाल लागला आहे. राणेंच्या समर्थकांमध्ये या निकालामुळे आनंदाचे वातावरण आहे.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)#Nitesh Rane(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x