14 August 2022 11:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Xiaomi CyberOne Robot | शाओमीने तयार केला स्मार्ट रोबोट, काम करताना मनुष्याच्या भावनेनुसार विचार करू शकणार Multibagger Mutual Funds | या 3 जबरदस्त मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना लक्षात ठेवा, SIP ने 3 वर्षात लाखोंचा फायदा Horoscope Today | 15 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 2023 Kia Ray | 2023 किआ रे कार लाँच, जबरदस्त लूकसह मिळणार शानदार असे फीचर्स Viral Video | तो बाईक सहित खड्ड्यात पडला की खड्ड्यातून वर आला?, विचित्र अपघाताचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय अमित शहांनी फडणवीसांना उपमुख्यमंत्री बनवलं | तर फडणवीसांनी मुनगंटीवार आणि चंद्रकांतदादांचं राजकीय वजन घटवलं शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचं खातेवाटप | दादा भुसेंकडून कृषी खातं सत्तारांकडे, शिंदेंकडून मूळ शिवसैनिकांना हलकी खाती
x

कल्याणमध्ये शिवसैनिक-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा | शिवसैनिकांनी भाजपचे कार्यालय फोडले

Narayan Rane

कल्याण, २४ ऑगस्ट | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी (दि. 23) एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले आहे. त्या विधानाच्या निषेधार्थ राज्यभरात शेडको शिवसैनिकांकडून राणे यांचा विविध प्रकारे आंदोलन करून निषेध व्यक्त केला जात आहे. त्यातच कल्याण पश्चिम भागातील कल्याण भाजप शहर कार्यलयावर शिवसैनिकांनी हल्ला केला. त्यावेळी काही भाजपचे कार्यकर्ते मध्ये आलेले असता दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.

कल्याणमध्ये शिवसैनिक-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा, शिवसैनिकांनी भाजपचे कार्यालय फोडले – Shivsena activist attack on BJP Kalyan office :

कल्याण पश्चिम भागातील अहिल्यादेवी होळकर चौकात भाजप शहर कार्यालय आहे. राणेंच्या विधानावरुन आज राज्यभर शिवसैनिक आक्रमक झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी ठिकठिकाणी असलेल्या भाजप कार्यलयालाबाहेर बंदोबस्त तैनात करण्यात आला. असे असतानाही कल्याण पश्चिम भागातील अहिल्यादेवी होळकर चौकात भाजप शहर कार्यलय आहे. या कार्यलयाची शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर आणि शहर प्रमुख विजय उर्फ बंड्या साळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांडून हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी काही भाजप कार्यकर्ते शिवसैनीकांना रोखण्याचा प्रयत्न करत असतानाच दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाली. मात्र, या घटनेमुळे कल्याण शहरात तणावाचे वातावरण पसरले आहे. आता याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Shivsena activist attack on BJP Kalyan office news updates.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(140)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x