15 December 2024 10:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

शिंदे गटातील भ्रष्ट बंडखोर सेना आमदारांवरील ईडी कारवाया थांबल्या | आता ईडीचं पथक संजय राऊतांच्या घरी

Shivsena MP Sanjay Raut home check details 31 July 2022

MP Sanjay Raut | शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांच्या घरी आज सकाळीच ईडी अर्थात सक्तवसुली संचलनायलाचे पथक दाखल झाले. संजय राऊत यांच्यावर पत्राचाळ जमीन प्रकरणात गैरव्यवहार केल्याचे आरोप असून, गेल्या काही महिन्यांपासून या प्रकरणाची ईडीकडून चौकशी सुरू आहे.

पत्रा चाळ प्रकरणात ईडीने संजय राऊतांना समन्स बजावलेलं होतं. मात्र, संजय राऊत चौकशीसाठी हजर राहिले नाही. त्यानंतर ईडीकडून पुन्हा समन्स पाठवलं जाऊ शकतं, अशी चर्चा सुरू असतानाच आज ईडीचं पथक त्यांच्या घरी दाखल झालं. संजय राऊत यांच्या भांडूप येथील घरी ईडीचे अधिकारी पोहोचले असून, त्यांची चौकशी केली जाणार आहे.

यापूर्वी १ जुलै रोजी खासदार संजय राऊत ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांची १० तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर संजय राऊत यांना २० जुलै आणि २७ जुलै रोजी समन्स बजावण्यात आलेलं होतं, मात्र ते चौकशीसाठी हजर राहिले नाही. संजय राऊत यांच्या भांडूप येथील मैत्री बंगल्यात ईडीचं पथक असून, बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

संजय राऊतांचा आज हिशोब होणार – किरीट सोमय्या
किरीट सोमय्या म्हणाले, “मी संजय राऊत यांच्या लुटमार, भ्रष्टाचार, माफियागिरी, दादागिरी यांचे पुरावे देत होतो. महाविकास आघाडी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होती. महाविकास आघाडीचे पोलीस आयुक्त संजय पांडे हे संजय राऊतांचे अत्याचारामध्ये भागीदार झाले होते. आता सगळ्याचा हिशोब देण्याची वेळ आली आहे आणि मला खात्री आहे की, महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेची लुटमार करण्याचा, दादागिरी, माफियागिरी करणाऱ्या संजय राऊतांचा आज हिशोब होणार.”

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: ED raided on Shivsena MP Sanjay Raut home check details 31 July 2022.

हॅशटॅग्स

#Shivsena MP Sanjay Raut(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x