3 May 2024 12:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

सत्ताधाऱ्यांनो सत्तेच्या खाटेची चिंता नंतर आधी पेशंटच्या खाटेचं बघा - आ. राम कदम

MLA Ram Kadam, MahaVikas Aghadi, Saamana Newspaper

मुंबई, १६ जून : ‘खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करु नये’, अशा शब्दात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून काँग्रेसच्या नाराजीनाट्यावर निशाणा साधण्यात आला आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली. ‘आम्ही आघाडीसोबत आहोत. उद्धव ठाकरेंसमोर भूमिका मांडू. आमचे मुद्दे जनतेच्या हिताचे आहेत’, असे त्यांनी म्हटले. त्याचबरोबर सामनाच्या अग्रलेखाबाबत बोलताना ‘व्यवस्थित माहिती मिळवून लिखाण असावं’, असे म्हणत ‘मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यानंतर चांगला अग्रलेख येईल’, असेही त्यांनी सांगितले.

तसेच ‘कोणत्याही बदलासाठी आम्ही आग्रही नाही आहोत. राज्यातील जनतेच्या हितासाठी निर्णय घ्यावेत अशी आमची इच्छा आहे. खाटेचं किमान ऐकूण तरी घ्यावं. त्याने शंकेचं निरसन तरी होईल’, असे थोरात म्हणाले. दरम्यान, प्रशासनातील अधिकाऱ्यांवरुन काँग्रेसमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात आज बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. याआधी बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मात्र भाजपने सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यात आला आहे. यामध्ये काँग्रेसला थेट तुमची खाट का कुरकुरतेय असा सवाल विचारण्यात आला. यावरूनचच भाजपने महाविकास आघाडी सरकारला आता टोला लगावला आहे. सत्ताधाऱ्यांनो सत्तेच्या खाटेची चिंता नंतर आधी पेशंटच्या खाटेचं बघा असं म्हणत हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे अनेक लोकांचा मृत्यू होत असताना सरकारला मात्र फक्त खुर्चीची चिंता आहे असा टोला भाजपाने लगावला आहे. भाजपाचे प्रवक्ते राम कदम यांनी मंगळवारी महाविकास आघाडी सरकारमधील मंडळी खाटेवरून चर्चा करत असल्याने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यातील रुग्णालयात खाट (बेड) उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू होत असल्याचं सध्याचं चित्र आहे. असं असताना यांना लोकांच्या मृत्यूची चिंता नसल्याने त्याचं दु:ख होत असल्याचं म्हटलं आहे. तसेच महाविकास आघाडी फक्त खुर्चीच्या विचारात मग्न आहे. सामनातून काँग्रेस-राष्ट्रवादीची लाज काढली?, काँग्रेस-राष्ट्रवादीत स्वाभिमान शिल्लक आहे का? असा सवालही राम कदम यांनी विचारला आहे.

 

News English Summary: The BJP has targeted the ruling party. In this, the question was asked directly to the Congress why your bed is grumbling. Due to this, BJP has now imposed a toll on the Mahavikas Aghadi government. Authorities have attacked the bed of power, saying look at the patient’s bed first.

News English Title: Due to this BJP has now imposed a toll on the Mahavikas Aghadi government News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x