28 April 2024 10:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार? SBI CIBIL Score | पगारदारांनो! 'या' चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो, अशा प्रकारे वाढवा क्रेडिट स्कोअर Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस?
x

राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मराठी जनता आणि मराठी पत्रकार देखील संताप व्यक्त करताना एकवटले

Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari

राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या मुंबईबद्दलच्या विधानानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. विविध राजकीय पक्षातील नेते आपल्या प्रतिक्रिया देत आहे. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपचे नेत्यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कारण आमदार नितेश राणे, विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप आमदार आशिष शेलार यांनी असहमत असल्याचे म्हटले आहे.

राज्यपालांच्या समर्थनार्थ काय म्हणाले नितेश राणे :
राज्यपालांचे समर्थन करत नितेश राणेंनी ट्विट केले होते. ”राज्यपालांकडून कोणाचा ही अपमान झालेला नाही. त्यांनी फक्त त्या-त्या समाजाला त्यांच्या योगदानाचे श्रेय दिले आहे. कालच्या कार्यक्रमाला मी स्वतः होतो आणि इतर लोक प्रतिनिधी उपस्थित होते. राजस्थान, गुजराती समाज त्या ठिकानी होता, त्या ठिकाणी जे भाषण केले त्यात अपमान झाला असता तर आम्ही गप्प बसलो असतो का?” असे नितेश राणे म्हणाले.

प्रसाद लाड काय म्हणाले :
प्रसाद लाड यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते म्हणाले ”राज्यपालांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे. ज्याला घरात ठेवायचं का बाहेर काढायचं उद्धव ठाकरे यांना अधिकार नाही त्यांनी राज्यपालांचा मान ठेवला नाही असे म्हणत प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली आहे.

राज्यपालांच्या वक्तव्यावर आशिष शेलारांचं स्पष्टीकरण :
भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करत राज्यपालांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचे सांगितले आहे. शेलार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले ”राज्यपाल महोदयांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाही. महाराष्ट्र आणि मुंबई मराठी माणसाच्या परिश्रमातून, घामातून आणि हौतात्म्यातून उभी राहीली आहे. आमचा तेजस्वी इतिहास पानोपानी हेच सांगतो. त्याला कुणीही कुठल्याही पदावरून नख लावण्याचा प्रयत्न करु नये!’

सर्व अनुभवी मराठी पत्रकार देखील समाज माध्यमांवर एकवटले :

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari controversial statement check details 30 July 2022.

हॅशटॅग्स

#BhagatSinghKoshayari(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x