28 April 2024 10:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

Loksabha Elections | प्रचंड महागाई, बेरोजगारीमुळे लोकसभा निवडणूक अवघड | मोदी 1 वर्ष आधीच प्रचार सुरु करणार

Loksabha Elections 2024

Loksabha Elections | लोकसभा निवडणूक 2024 च्या आधी भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी मोठी योजना आखली आहे. या योजनेच्या आधारे देशभरातील सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी भाजपच्या नेतृत्वाला पक्षाच्या बाजूने भक्कम आधार कायम ठेवायचा आहे. पंतप्रधान मोदी हे देशातील लोकप्रिय नेते म्हणून उदयाला आले आहेत. अशा परिस्थितीत भाजपला या लोकप्रियतेचा राजकीय फायदा प्रत्येक निवडणुकीत मिळतो. मात्र, २०१४ पासून भाजपने आपले काम मोठ्या प्रमाणावर करण्याच्या धोरणात बदल केला आहे.

भाजपाला शंका आणि त्याला कारण :
मात्र आता मतदार त्यांच्या नावाने मतं देईल का यात भाजपाला शंका आहे आणि त्याला कारण आहे प्रचंड प्रमाणात वाढलेली महागाई आणि बेरोजगारी असं वृत्त आहे. ईडी आणि सीबीआय कारवाया हे मुद्दे लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग नसतात. तसेच ईडीचा अति गैरवापर आणि त्यानंतर त्याच आरोप असलेल्या नेत्यांना पुन्हा भाजपमध्ये सामावून घेण्याचे प्रकार लोकांना कळून चुकले आहेत.

नियोजनावरही आतापासूनच काम सुरू :
याच रणनीतीचा भाग म्हणून भाजपने २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदी यांच्या देशभरातील दौऱ्याच्या नियोजनावरही आतापासूनच काम सुरू केले आहे. याअंतर्गत येत्या एका वर्षात पंतप्रधान मोदींचे देशभरात दौरे आणि सभा होणार आहेत.

भाजपने एक टीम तयार केली :
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दौऱ्यांच्या तयारीवर लक्ष ठेवण्यासाठी, त्यांना अंतिम स्वरूप देण्यासाठी भाजपनं एक टीम तयार केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग आणि सहसंयोजक राष्ट्रीय सचिव ऋतुराज सिन्हा यांनी या पथकाला पाचारण केले आहे. याशिवाय अरविंद मेनन, अलका गुर्जर, प्रद्युम्न कुमार, राजकुमार पुलवारिया आणि युवा मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस रोहित चहल यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

भाजपाला प्रचंड महागाई आणि बेरोजगारीची भीती :
भारतीय जनता पक्षाला आगामी लोकसभा निवडणुकीत प्रचंड महागाई आणि बेरोजगारीचा फटका बसणार याची खात्री आहे असं अंतर्गत गोटातून माहिती समोर आली. कारण याच मुद्यावरून मोदी सरकार २०१४ मध्ये सत्तेत आले होते. मात्र जनतेने दोन टर्म म्हणजे तब्बल १० वर्ष सत्ता देऊनही मोदी सरकार महागाई आणि बेरोजगारीवरीन अपयशी ठरलं आहे. त्यामुळे लोकांना या मुद्यांपासून परावृत्त करण्यासाठी धर्म आणि जातीच्या मुद्यांना प्राधान्य देताना पुन्हा मागच्या सरकारने कसा देश लुटला याचा पाढा वाचला जाऊ शकतो. तसेच हिंदू आणि मुस्लिमांसबंधित मुद्दे माध्यमांवर कसे प्रकाशझोतात राहतील याची विशेष काळजी घेतली जाईल असं खात्रीलायक वृत्त आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Loksabha Elections 2024 BJP Campaign check details 24 June 2022.

हॅशटॅग्स

#Loksabha Elections 2024(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x