12 December 2024 7:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Eknath Shinde | शिंदेंना धक्का | गटनेतेपदी अजय चौधरींना मान्यता | आमदारांच्या अपात्रतेवर ऑनलाइन सुनावणी

Eknath Shinde

Eknath Shinde | एकनाथ शिंदे गटासाठी आता एक झटका देणारी बातमी समोर आली आहे. अजय चौधरी यांची गटनेते पदी विधीमंडळच्या डायरीत नोंद झाली आहे. गटनेतेपदी अजय चौधरी यांनाच मान्यता दिली गेली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या आदेशाने ही नोंद केली गेली आहे. तर 12 आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत ऑनलाइन सुनावणी होणार आहे.

50 आमदारांचा पाठिंबा :
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदेंनी शिवसेनेविरोधात बंड केले आहे. आपल्याला 50 आमदारांचा पाठिंबा असल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले आहे. काल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने १२ आमदारांना आणि आज ४ आमदारांचे सदस्यत्व रद्द करावं अशी मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे केली आहे. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी पलटवार केला आहे. आम्हाला घाबरावयाचा प्रयत्न केला जात असल्याचे शिंदे म्हणाले आहेत.

शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत नेमकी काय कारवाई होऊ शकते :
1. शिवसेनेकडून अपात्रतेबाबत विधानसभा उपांध्यक्षांकडे याचिका दाखल करण्यात आल्यानंतर आता विधानसभा उपाध्यक्ष त्या 12 आमदारांना नोटीस देऊ शकतात
2. आमदारांना नोटीस पाठवल्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष नोटीसबाबत नेमकं त्या आमदारांचं काय म्हणणं आहे, याबाबत जाणून घेणार
3. कोरोनानंतरदेखील आमदारांना ऑनलाईन सुनावणी हवी आहे की राहू ते स्वतः याठिकाणी येऊन सुनावणीसाठी उपस्थित राहाणार हे ठरवलं जाणार आहे.
4. जर ते ऑनलाईन उपस्थित राहू इच्छित असतील तर त्यासाठी नॅशनल इनफॉरमेटिक सेंटरकडून देण्यात आलेल्या बँडविडथचा वापर करावा लागणार आहे. सध्याच्या परिस्थीती या बँडविडथची उपलब्धता पाहता दिवसाला केवळ 2 किंवा 4 आमदारांची सुनावणी पार पडू शकते.
5. ही अर्धन्यायिक प्रक्रिया आहे. यासाठी विशिष्ट वेळेची मर्यादा नाही माञ विधान भवनाच्या वतीने ही सुनावणी लवकरात लवकर पार पडावी यासाठी प्रयत्न होणारं आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eknath Shinde politics in trouble Shivsena got big benefits check details 24 June 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x